‘महाराष्ट्र-कर्नाटकाच्या राज्यपालांमध्ये काय बोलणं झालं?’ सतेज पाटलांनी उपस्थित केली शंका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांमध्ये कोल्हापुरात बैठक झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शंका व्यक्त केलीये. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना मारहाण झाल्याची घटना घडल्या असून, याविरोधात महाराष्ट्रातून रोष […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांमध्ये कोल्हापुरात बैठक झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शंका व्यक्त केलीये.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना मारहाण झाल्याची घटना घडल्या असून, याविरोधात महाराष्ट्रातून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यपालांची बैठक कोल्हापुरात झाल्याचा मुद्दा मांडत प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं काम केलंय पठ्ठ्यांनी, कर्नाटकला ‘असा’ शिकवलाय धडा!










