निकष काय आहेत?; ‘द कश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यावरून ‘झुंड’च्या निर्मात्याच्या सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या देशभर द कश्मीर फाईल्स चित्रपट गाजत आहे. चित्रपटगृहात सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर राजकीय वर्तुळात चित्रपट वादाचा मुद्दा बनला आहे. दुसरीकडे द कश्मिरी फाईल्स चित्रपट बघण्याचं आवाहन भाजप आणि भाजप शासित राज्यांकडून केलं जात आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांनी सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. यावरून आता झुंडच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी थेट चित्रपटाचं समर्थन करण्याचे आणि सिनमा टॅक्स फ्री करण्याचे सरकारचे निकष काय आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे.

सविता राज हिरेमठ यांनी टॅक्स फ्री आणि सरकारकडून सरकारच्या समर्थनाचा मुद्दा उपस्थित केला असून, अनेक प्रश्न विचारले आहेत. सविता राज हिरेमठ यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा मुद्दा मांडला आहे. त्यांची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आली आहे.

“द कश्मीर फाईल्स दहशतवाद्यांचा कट असू शकतो, कारण…”; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे झुंडच्या निर्मात्या सविता यांची पोस्ट?

“काही दिवसांपूर्वीच मी द कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला. चित्रपट बघून मला वाईट वाटलं. कश्मिरी पंडितांच्या हक्कांबद्दल सिनेमातून आवाज उठवण्यात आला आहे. दुसरीकडे झुंडची निर्माती म्हणून मी बघायला गेले, तर मी काहीशी गोंधळून गेले आहे. कारण शेवटी झुंडही एक महत्त्वाचा चित्रपट आहे आणि या चित्रपटातही एक गोष्ट आहे. एक मोठा संदेश आहे. ज्याला देशातील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”

ADVERTISEMENT

“मला फक्त जाणून घ्यायचं आहे की, कोणते निकष आहेत? ज्या आधारावर सरकारकडून चित्रपटाचं समर्थन केलं जातं आणि टॅक्स फ्री केला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचं समर्थन केलं जातं आणि कार्यालयांना चित्रपट दाखवण्याचं आणि कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सु्ट्टी दिली जाते?”

ADVERTISEMENT

चित्रपटामुळे तेढ निर्माण होऊ नये! द काश्मीर फाईल सिनेमावरील चर्चांवर नाना पाटेकरांचं परखड मत

“झुंडही एक असा विषय आहे जो आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. झुंड फक्त जाती आणि आर्थिक असमानतेबद्दल बोलत नाही, तर समाजातील खालच्या स्तरातील समुदाय त्यांच्या यशाचे मार्ग कसे शोधतात हेही दाखवते”, असं सविता राज हिरेमठ यांनी म्हटलं आहे.

अनेक राज्यात कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री

द कश्मीर फाईल्स चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक राज्यांनी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, त्रिपुरा आणि गोवा या राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. आसाम सरकारने द कश्मीर फाईल्स चित्रपट बघण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे झुंड चित्रपटही चर्चेत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे याने केलेलं आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT