मोठी बातमी! वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे मुंबईपाठोपाठ पुण्यातल्याही शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे रूग्ण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पुण्यातही आज असाच निर्णय घेण्यात आला. पुण्यातल्या शाळाही आता 30 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे रूग्ण वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पुण्यातही आज असाच निर्णय घेण्यात आला. पुण्यातल्या शाळाही आता 30 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीसाठी पुण्यात होते. त्यावेळी हा निर्णय झाला.
मुंबईतल्या शाळांना कोरोनानं लावलं टाळं; महापालिकेनं घेतला तडकाफडकी निर्णय
पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील चोवीस तासात पुण्यात 444 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल हे सांगितलंच होतं त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने 16 डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील बहुतांश खासगी शाळांनी नाताळच्या सुट्टीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून अनेक शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग गजबजले. या शाळांमध्ये दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी पाऊल ठेवले. शाळांनीही दोन सत्रात शाळा भरवून एका वर्गातील विद्यार्थी या दोन सत्रांमध्ये विभागले होते.