पाहा अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र, जसंच्या तसं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यासंबंधी दिलेल्या CBI चौकशीचे आदेशानंतर आज (५ एप्रिल) अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर देशमुखांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

याबाबतचं राजीनामा पत्र हे अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे. पाहा त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नेमकं काय म्हटलं आहे.

CBI चौकशीच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

हे वाचलं का?

मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब,

मुख्यमंत्री,

ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य,

ADVERTISEMENT

मंत्रालय, मुंबई,

आदरणीय महोदय,

मा. उच्च न्यायालय, मुंबई त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती.

असं अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलं आहे.

मोठी बातमी ! परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार

मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपांची CBI कडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंकडे १०० कोटींची मागणी केल्याचा दावा केला होता. या पत्रानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ माजला होता.

यानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवरचा निकाल राखून ठेवला होता. या याचिकेवर आज सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या प्रकरणात CBI चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT