Pandharpur: विठ्ठलाच्या चंदन उटी पुजेसाठी किती रुपयात होणार नोंदणी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

वैशाख वणव्याची दाहकता चैत्रात जाणवू लागली आहे. दोन वर्षीनी श्री विठुरायाच्या परंपरागत चंदन उटी पूजेला भाविकांकडून सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

रविवारी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या पहिल्या चंदन उटी पूजेला प्रारंभ झाला असून श्री विठ्ठलच्या आणि रूक्मिणी मातेच्या 121 चंदनउटी पूजा होणार आहे.

ADVERTISEMENT

विठ्ठल-रूक्मिणीसोबतच महालक्ष्मी, व्यंकटेश, राधिकामाता, सत्यभामा यांना देखील चंदनउटी पूजा करण्यात आली.

ADVERTISEMENT

यावर्षी प्रथमच कोरोना या विषाणुच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने भाविकांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहेत.

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दररोजच्या चंदनउटी पूजेसाठी 750 ग्राम उगाळलेल्या चंदनाचा वापर करण्यात येतो.

तीन महिने उन्हाची तीव्रता अधिक असते त्यामुळे श्री विठुरायाला उष्णते पासून दिलासा मिळावा म्हणून, यासाठी शीतल चंदनाचा लेप अंगाला लावण्यात येतो.

चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदनउटीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते.

विठुरायाच्या पोषाखावेळी रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर चंदनाचा लेप लावण्यात येतो.

श्री विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली येते.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती तर्फे विठ्ठल-रूक्मिणी मातेस दरवर्षी चंदनउटी पूजा असते. श्री विठ्ठलाच्या 61 तर श्री रूक्मिणी मातेस 60 अशा 121 चंदनउटी पूजा होणार आहे.

विठ्ठलाची चंदनउटी पूजा 21 हजार तर रूक्मिणी मातेची चंदनउटी पूजा 9 हजार रूपये असणार आहे. पूजेसाठी भाविकांना अॉनलाईन बुकिंग करावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT