सरनाईक सर्वांच्या मनातलं बोलले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेना युती शक्य – खासदार गिरीश बापट
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रानंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनीही सरनाईक यांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया देत, सरनाईक सर्वांच्या मनातली भावना बोलले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची युती होऊ शकते असं म्हटलं आहे. भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रताप सरनाईक […]
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रानंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनीही सरनाईक यांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया देत, सरनाईक सर्वांच्या मनातली भावना बोलले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची युती होऊ शकते असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. भविष्यकाळात या गोष्टी होऊ शकतात. शिवसेना आणि भाजप यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होऊ शकते. आमची गेल्या काही वर्षांपासून याच मुद्द्यावर नैसर्गिक युती होती, परंतू काही कृत्रिम लोकांमुळे ती तुटली. नाईक आता जे बोलत आहेत तेच भाजपचे नेते महाविकास आघाडी होत असताना बोलत होते. भविष्यात ही युती झाली तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया गिरीश बापट यांनी दिली.
याचसोबत आगामी पुणे महापालिकेच्या दृष्टीकोनातून युती करण्यासाठी आमचं पहिलं प्राधान्य हे शिवसेनेला राहिलं. राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्राचा एक छोटासा पक्ष आहे तो काही अखिल भारतीय पक्ष नसल्याचं सांगत गिरीश बापटांनी राष्ट्रवादीला चिमटा काढला. सरनाईकांच्या पत्रानंतर भाजप नेत्यांनी युतीसाठी सकारात्मकता दाखवली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरनाईक यांच्या पत्रावर बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का?
“भारतीय जनता पार्टी स्वबळावरच लढते आहे. प्रश्न त्यांचाच आहे, आता त्यांनीच आपापसात ठरवायचं आहे की कोणाला जोडे मारायचे आणि कोणाला हार घालायचे. कोणी कोणाच्या सोबत जायचं हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. आम्हाला त्यावर फारकाही बोलायचं नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत राहू.” देवेंद्र फडणवीस पुण्यात एका लग्नसोहळ्याला उपस्थित असताना पत्रकारांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT