Bhushan Desai : “सुभाष देसाईंना स्पष्टपणे सांगून निघालोय, मी शिंदेंसोबत…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज (सोमवारी) शिवसेनेत प्रवेश केला. “मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सुरु असलेली वाटचाल आणि राज्यात महायुतीचे सरकार करत असलेल्या कामावर प्रभावित होऊनच आपण पक्षप्रवेश करत आहे”, असं यावेळी भूषण देसाई यांनी स्पष्ट केलं. (Senior leader Subhash Desai’s son Bhushan Subhash Desai join Shiv Sena party)

ADVERTISEMENT

काय म्हणाले भूषण देसाई?

बाळासाहेब ठाकरे हेच माझं दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरं काही माझ्यासमोर आलेलं मला आठवतं नाही. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार, त्यांनी बघितलेलं महाराष्ट्रासाठीचे स्वप्न आणि स्वरुप, महाराष्ट्राचा विकास आणि विचार हे जर आज जर कोणी पुढे घेऊन जात असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मी यापूर्वी एकनाथ शिंदेंसोबत जवळून काम केलं आहे. आताही त्यांचं काम बघून आणि त्यांच्या कामावरुन प्रेरित होऊन मी शिंदेंसोबत आलो आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर शिंदेंसोबत?

या आरोपांवर बोलताना भूषण देसाई म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मी शिंदेंसोबत आलो असं अजिबात नाही. माझ्या वडिलांनी पाच दशक शिवसेनेसाठी काम केलं. पण आता मला माझे स्वतंत्र विचार आहेत. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. मी खूप पूर्वीच हा निर्णय घेतला होता. हे सरकार स्थापन झालं तेव्हाच मी शिंदेंसोबत येण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरे वॉशिंग मशीन म्हणतात, पण मी त्यांच्या तुलनेत लहान आहे, मी त्यांच्या टिकेवर जास्त बोलणार नाही. मात्र मला ही वॉशिंग मशीन वाटतं नाही. शिंदेंचे विकासात्मक काम पाहून इथे आलो आहे. निवडणूक आणि पद यासाठी मी इथे आलेलो नाही. पण पक्ष मला जी जबाबदारी जे काम देतील त्यासह पुढे जाणार आहे.

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

ADVERTISEMENT

भूषण देसाईंवर भाजपने केले होते भ्रष्टाचाराचे आरोप अन् चौकशीचीही मागणी :

भूषण देसाई यांच्यावर महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वेदांता-फॉक्सकॉन आणि ‘एअरबस- टाटा’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या काळात हे प्रकल्प गुजरातला गेल्याचे आरोप करत तत्कालिन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आणि त्यांचा मुलगा भूषण देसाई यांच्यावर उद्योगपतींकडून टक्केवारी मागितल्याचा आरोप केला होता. तसंच ही टक्केवारी मातोश्रीवर दिली जात असल्याचही ते म्हणाले होते.

ADVERTISEMENT

Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ

याशिवाय दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीमध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. तसंच याप्रकरणात एसआयटी स्थापन करुन सुभाष देसाई आणि भूषण देसाई यांची चौकशी करा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली होती. यानंतर आता भूणष देसाई हे स्वतः शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे आता याबाबत भाजपची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT