सचिन वाझेच्या ‘लेटरबॉम्ब’आधी दिवसभरात काय-काय घडलं?, समजून घ्या Chronology
मुंबई: अँटेलिया संशयित कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA च्या अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने एक अत्यंत खळबळजनक पत्र लिहलं आहे. या पत्रातून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण हे पत्र बाहेर येण्याआधी […]
ADVERTISEMENT

मुंबई: अँटेलिया संशयित कार प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA च्या अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) याने एक अत्यंत खळबळजनक पत्र लिहलं आहे. या पत्रातून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पण हे पत्र बाहेर येण्याआधी आज दिवसभरात काय-काय घडलं (chronology) हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
सचिन वाझेचं पत्र बाहेर येईपर्यंतचा नेमका घटनाक्रम कसा आहे?
-
आज दिवसाची सुरवात झाली ती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्य सरकारला सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्याच्या प्रक्रीयेबद्दल एक अहवाल सादर केला. ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की, सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्याचा निर्णय हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या रिव्ह्यू मिटींगमध्ये झाला होता. ज्या बैठकीला स्वतः पोलीस आयुक्त, आर्म फोर्सेसचे अतिरीक्त आयुक्त, जॉइंट सीपी (Admin) आणि मंत्रालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस उपायुक्त हजर होते.
-
पोलीस दलात वाझेला सामावून घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांची आर्म फोर्सेसमध्ये नेमणूक करण्यात आली होती. यानंतर ९ जून २०२० रोजी गुन्हे शाखेच्या सह आयुक्तांनी सचिन वाझेंची CIU मध्ये बदली केली.
