नागपूर विद्यापीठात खळबळ! जनसंपर्क अधिकारी, सात प्राध्यापक आणि १६ लाख; प्रकरण काय?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचं सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आलाय. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे […]
ADVERTISEMENT

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचं सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आलाय. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
प्राध्यापकांच्या तक्रारीनुसार विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. धर्मेश धावणकर यांनी लोकप्रशासन विभागाचे प्रमुख जितेंद्र वासनिक, प्रवास पर्यटन विभागाचे प्रभारी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अशोक बोरकर, ग्रंथालय शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.सत्यप्रकाश निकोसे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सत्यप्रकाश इंदूरवाडे, जीवनरसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.वीरेंद्र मेश्राम, मराठी विभागाचे डॉ. शैलेंद्र लेंडे यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.
नागपूर : शेअर मार्केटच्या नादात मुलाने घरावरच मारला डल्ला, ७३ लाखांची चोरी
‘तुमच्या विरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारीमधून तुम्हाला बाहेर निघायचं असेल, तर पैसे द्यावे लागतील, अशी धमकी दिली. या प्राध्यापकांकडून सोळा लाख रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.