Sextortion मध्ये अडकलेल्या वृद्धाला 60 लाखांचा गंडा!

मुंबई तक

मुंबईत Sextortion मध्ये अडकलेल्या एका 65 वर्षीय वृद्धासोबत धक्कादायक प्रकार घडलाय. हे प्रकरण मुंबईचं आहे. जिथे एका 65 वर्षीय व्यक्तीने पुनर्विवाहासाठी मॅरेज पोर्टलवर नोंदणी केली होती. मॅरेज पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर या व्यक्तीची ओळख एका महिलेशी झाली. दोघांचं हळूहळू बोलणं सुरू झालं. नंतर, नंबर एक्सचेंज करून दोघांची जवळीक वाढली. यानंतर महिलेने व्हिडीओ कॉल केला आणि स्वत:चे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत Sextortion मध्ये अडकलेल्या एका 65 वर्षीय वृद्धासोबत धक्कादायक प्रकार घडलाय.

हे प्रकरण मुंबईचं आहे. जिथे एका 65 वर्षीय व्यक्तीने पुनर्विवाहासाठी मॅरेज पोर्टलवर नोंदणी केली होती.

मॅरेज पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर या व्यक्तीची ओळख एका महिलेशी झाली.

दोघांचं हळूहळू बोलणं सुरू झालं. नंतर, नंबर एक्सचेंज करून दोघांची जवळीक वाढली.

यानंतर महिलेने व्हिडीओ कॉल केला आणि स्वत:चे कपडे काढले. तिच्या सांगण्यावरून वृद्ध व्यक्तीनेही तसंच केलं.

यावेळी महिलेने 65 वर्षीय व्यक्तीचा व्हिडीओ काढला आणि खंडणी उकळण्याचं प्रयत्न केला.

महिला त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करू लागली. पैसे न दिल्यास व्हिडीओ लीक करेन असं तिने धमकावलं.

वृद्ध व्यक्तीने महिलेला अनेकदा पैसे ट्रान्सफर केले आणि अशाप्रकारे 60 लाख रूपये दिले. पण, महिलेचं धमकावणं काही बंद झालं नाही.

शेवटी वृद्ध व्यक्तीने पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp