मलिकांना अटक! शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मलिकांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल काय असेल, याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान शरद पवार यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार आहे.

ADVERTISEMENT

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आज मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली. मलिक यांना सकाळीच चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आलं होतं. काही तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मलिकांच्या अटकेनंतर भाजपकडून त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविका आघाडी सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, मलिक यांना ईडीने न्यायालयासमोर हजर केल्यानंतर इकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर अनेक नेते दाखल झाले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, राजेश टोपे, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरच काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील केदार हे नेतही पवारांच्या आले होते.

नेत्यांसोबत शरद पवार यांनी निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. या चर्चेनंतर शरद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक वरून मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे रवाना झाले. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळही आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT