कृषी बिलावरुन तोमर यांना पवारांचे उत्तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता नवे वळण घेतले आहे. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक होत पोलीस कारवाईचा बडगा उगारला आहे.

या घटनाक्रमानंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत पवार हे देशातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला आहे.

तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषी कायद्यांमुळे बाजार समित्या किंवा मंडई व्यवस्था दुबळी होईल, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल केवळ राज्यातच नव्हे; तर राज्याबाहेर विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. नव्या कायद्यांत आहेत तशाच कृषी सुधारणा करण्याचा शरद पवार यांनी याआधी जोरकस प्रयत्न केला होता, असेही तोमर म्हणाले होते.

ADVERTISEMENT

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या टीकेवर पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

‘चूक काय आणि बरोबर काय यावर प्रदीर्घ काळ चर्चा होऊ शकते पण सत्य समोर यायला हवं. ते समोर आणणं हे कृषीमंत्र्यांचं काम आहे,’ असं आव्हानच शरद पवार यांनी दिलं आहे.

नरेंद्रसिंह तोमर यांचे मुद्दे खोडून काढताना ‘मूळ स्वरूपाच्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देण्याचे कोणतेही अभिवचन दिले गेले नव्हते. केवळ शेतकरी आंदोलनानंतर त्यात एमएसपीचा संदर्भ आणला गेला.

तसेच केंद्रीय कृषिमंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर आता सांगत आहेत की नवीन कायद्यातील तरतुदींचा वर्तमान एमएसपी प्रणालीवर अजिबात परिणाम होणार नाही. नवीन कायद्यानुसार शेतकरी आपला माल बाजार समितीच्या बाहेर विकू शकतात, परंतु त्यात खासगी खरेदीदारांकडून खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण दिलेले नाही. आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांचं हे सुरुवातीपासूनच म्हणणं होतं.

शरद पवारांना शेतकरी आंदोलनावर याआधी सुध्दा लक्ष करण्यात आलं होतं. आत्ता केंद्र सरकारने जे शेती सुधारणा कायदे केले आहेत त्याच स्वरुपाचे कायदे पवारांनी याआधी केले होते असा पवारांवर सातत्याने आरोप केला जात होता या साऱ्या मुद्दांवर पवारांनी पलटवार करत आज स्पष्टीकरण दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT