शरद पवारांना आज डिस्चार्ज, १५ दिवसांनी पुन्हा शस्त्रक्रिया होणार

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला मुंबईच्या ब्रीड कँडी रुग्णालयात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. शरद पवार यांच्या गॉलब्लॅडरमधील (पित्ताशयातील) खडे यावेळी काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक शरद पवारांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होतं. यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याविषयी ट्विट करुन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३१ मार्चला मुंबईच्या ब्रीड कँडी रुग्णालयात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. शरद पवार यांच्या गॉलब्लॅडरमधील (पित्ताशयातील) खडे यावेळी काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक शरद पवारांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होतं. यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याविषयी ट्विट करुन माहिती दिली.

शरद पवार यांना डॉक्टरांनी तपासलं असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो आहे. यानंतर त्यांना पुढचे ७ दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १५ दिवसांनंतर शरद पवार यांची तब्येत व्यवस्थित असेल तर त्यांच्यावर गॉलब्लॅडरची दुसरी शस्त्रक्रीया करण्यात येईल, अशी माहिती नवाब मलिकांनी दिली आहे. यावेळी नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांना पाहण्यासाठी गर्दी करु नका असा सल्ला दिला आहे.

दरम्यान ३१ तारखेला शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडत असताना त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या. त्यावेळी अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार हॉस्पिटलमध्ये बसून पेपर वाचत असल्याचा फोटोही सुप्रिया सुळेंनी शेअर केला होता. शरद पवारांची तब्येत खालावल्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp