शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, खेळवत ठेवतात: नारायण राणे
सिंधुदुर्ग: ‘शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही.’ अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी एसटी संपावरुन महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘एसटी संपाबाबत तोडगा निघालेला […]
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग: ‘शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही.’ अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी एसटी संपावरुन महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
‘एसटी संपाबाबत तोडगा निघालेला नाही. त्यालाच म्हणतात शरद पवार..’
‘एसटीच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यालाच म्हणतात शरद पवार.. शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही. ते आदेश देऊ शकत नाहीत? ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार सांगू शकत नाही? कर्मचाऱ्यांना न्याय द्या ताबडतोब. एवढं तरी सांगायला पाहिजे ना. अरे कमीत कमी आम्ही विलिनीकरण एवढ्या दिवसात करु.. तोपर्यंत पगार, ग्रेडेशन का करत नाही?’
हे वाचलं का?
‘आतापर्यंत दोन ग्रेडेशन पेंडिंग आहेत. अरे मग एक-एक तरी करा आणि कामावर घ्या. निलंबितांना कामावर घ्या. हे प्रश्न शरद पवारांनी बोलून दाखवले पाहिजे. सरकारला सांगितलं पाहिजे करा. अर्थमंत्र्याला बाजूला बसून फायदा काय त्या अजित पवारला? त्यामुळे शरद पवार हे कुठलाही राज्याचा प्रश्न सोडवत नाहीत.’ अशी थेट टीका नारायण राणे यांनी पवारांवर केली आहे.
‘कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी परिवहन मंत्र्यांशीही चर्चा करायला तयार’
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो एसटीचा एवढे दिवस संप आणि जवळपास 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. भयावह परिस्थिती त्या सगळ्यांच्या घरी आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न ज्या प्रकारे खेळवतंय, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय त्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे.’
ADVERTISEMENT
‘एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नसताना केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत की, हा प्रश्न त्वरित मिटवा अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे.’
‘आम्ही जो मार्ग काढायचा आहे त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी बोलेन यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन. तसंच राज्यांमधे जे कोण परिवहन मंत्री आहेत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी सुद्धा बोलेन. पण आता हट्ट सोडा आणि तुम्ही न्याय देण्याच्या दृष्टीने चर्चेला लागा. हे मी त्यांना पण सांगेन.’ असंही राणे यावेळी म्हणाले.
शरद पवारांना उद्धव ठाकरे लाचार म्हणाले होते, आता गुणगान गात आहेत-नारायण राणे
‘मग हायकोर्टालाच द्या महाराष्ट्र चालवायला’
‘हायकोर्टाची वाट बघता मग तुम्ही काय कमी पडलात? मग सत्ता सोडा आणि हायकोर्टाला द्या महाराष्ट्र चालवायला. खरं म्हणजे हा विषय परिवहन मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला मांडायला हवा होता. हे सर्व निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतात ना? आता मुख्यमंत्र्यी नाहीत. पण दुसरे कोणी असतील मग त्यांना सांगा आणि निर्णय घ्या.’
‘अनिल परब कोकणचा वाटत नाही, केरळचा वाटतो. याला काय एसटी कर्मचाऱ्यांची आत्मियता आहे? तो हरकूळला कधी येतो का? माझ्या बाजूच्या गावात येतो कधी? तो मुंबईचा कलेक्टर आहे उद्धव ठाकरेंचा.’ असं म्हणत राणेंनी परिवहन मंत्री अनिल परबांवर यांच्यावरही बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT