पाठीत खंजीर खुपसण्याच्या ‘त्या’ आरोपाबाबत शरद पवार म्हणतात…

मुंबई तक

1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःच सरकार शरद पवार यांनी स्थापन केल्याचा आरोप नेहमी केला जातो. हाच संदर्भ देऊन शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात अस प्रमोद महाजन स्वतः पत्रकार परिषदेत सांगत असत. याबाबत इतक्या वर्षांनी शरद पवारांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका सविस्तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःच सरकार शरद पवार यांनी स्थापन केल्याचा आरोप नेहमी केला जातो. हाच संदर्भ देऊन शरद पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात अस प्रमोद महाजन स्वतः पत्रकार परिषदेत सांगत असत. याबाबत इतक्या वर्षांनी शरद पवारांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका सविस्तर मांडली आहे. इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि सिनीयर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.

सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर एनकेपी साळवे यांच्यामार्फत शरद पवारांकडे एक प्रस्ताव देण्यात आला होता. केसरींच्या निर्णयाने नाराज खासदारांनी पवारांच्या नेतृत्वात एक गट बनवावा, असा हा प्रस्ताव होता. पण जुनी प्रतिमा (पाठीत खंजीर खुपसण्याची) पुन्हा आपल्याशी जोडली जाऊ नये म्हणून पवारांनी हा प्रस्ताव फेटाळल्याचा उल्लेख इंद्रकुमार गुजराल यांच्या पुस्तकात आहे. याबद्दलच साहिल जोशी यांनी पवारांना प्रश्न विचारला. यावर पवार म्हणतात,

‘माझ्यावर नेहमी तो आरोप व्हायचा. नंतर तुम्ही म्हणता तसं देवेगौडांच्या वेळेलाही. शेवटी साळवेंच्या किंवा कुणाच्या तरी किंवा माझ्या घरी जवळपास 60-65 काँग्रेस सभासद जमले आणि अक्षरशः त्यांनी तुम्ही नेतृत्व करा, म्हणत माझ्यावर दबाव टाकला. बाकी सगळे पाठिंबा द्यायला तयार आहेत, असं सांगितलं.

देवेगौडा आणि इतरही लोकांनी तुम्ही सरकार बनवा. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असं मला सांगितलं. पण मी म्हणालो, एकदा या संबंधीचा ठपका माझ्या राजकीय जीवनावर कायम बसलाय. मला त्या रस्तानं पुन्हा जायचं नाही असं म्हणत शरद पवारांनी या प्रश्नाला उत्तर दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp