पवार साहेब खासगीत बोलले, 2024 ला हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच मुख्यमंत्री करेन: आव्हाड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबई: ‘पवार साहेब खासगीत बोलले तेच मी तुम्हाला सांगतोय, 2024 ला हेच सरकार सत्तेत येईल आणि मी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करेन.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

ज्या पद्धतीने पवार साहेबांनी.. त्या अर्थी बघायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार अंतर नाही. 56 आणि 54 चं अंतर.. दोन जागांचं अंतर फक्त. पण पवार साहेबांनी पुण्यात आपल्या मित्रांसमोर बोलताना सांगितलं की.. हे मी खासगीतील सांगतोय. साहेब म्हणाले की, ‘2024 देखील हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच पुन्हा मुख्यमंत्री करेन.’ असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

…म्हणून 2019 विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले!

2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप-शिवसेनेला राज्यातील जनतेने स्पष्ट कौल दिला होता. दोन पक्षांना बहुमत असल्याने ते पुन्हा एकदा युतीचं सरकार स्थापन करु शकत होते. मात्र, असं असताना दोन्ही पक्षांचं घोडं हे मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिलं होतं.

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीदरम्यान, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण हा शब्द जर भाजप पाळत नसेल तर आपल्यासाठी सगळे पर्याय उपलब्ध आहे. असं उद्धव ठाकरेंनी निकालाच्या दिवशीच स्पष्ट केलं होतं. ज्यानंतर राज्यात यावरुन प्रचंड राजकारण घडलं. एकीकडे दोन्ही पक्ष आपला मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्यास तयार नव्हते. तर दुसरीकडे शिवसेना उघडउघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते.

ADVERTISEMENT

अशावेळी मुख्य प्रश्न हा होता की, राज्यातील तीन प्रमुख पक्षांचं सरकार तयार होत असताना या सरकारचं नेतृत्व नेमकं कोण करेल. त्यावेळी स्वत: शरद पवार यांनी जाहीर केलं होतं की, मुख्यमंत्री पद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच स्वीकारतील. त्यानंतर यथाअवकाश मुख्यमंत्रीपदाची माळ ही उद्धव ठाकरे यांच्याच गळ्यात पडली.

दरम्यान, आता नुकतीच महाविकास आघाडीला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झाली आहे. अशावेळी प्रचंड आव्हानं समोर असून देखील उद्धव ठाकरे यांनी तीनही पक्षाचं सरकार हे उत्तमरित्या सांभाळलं असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधी पक्षाकडून ऐनकेन प्रकारे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप तीनही सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांचं संयमित नेतृत्वच सरकार तारु शकेल असा तीनही पक्षातील नेत्यांना विश्वास वाटत असल्याचं सध्या तरी दिसत आहे.

दुसरीकडे शरद पवार यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून अनेकदा पाठ थोपटली आहे, तसेच त्यांच्या काही कामांचं देखील कौतुक केलं आहे. अशावेळी जर 2024 साली पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तेव्हा देखील नेतृत्व हे उद्धव ठाकरेच करु शकतात.

शरद पवार यांच्यासह काँग्रेसने देखील उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात राजकीय गणितं कशी असतील आणि या राजकीय गणितांचा राज्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, असं सगळं असलं तरी सध्या उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार सध्या तरी चालणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शरद पवारांनी विकेटच काढली! असं का म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी आता नवी मुंबईतील कार्यक्रमात जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधकांना चर्चेसाठी नवा मुद्दा मिळाला आहे. जो पुढील काही दिवसात महत्त्वाचा ठरु शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT