Narayan Rane: पवार साहेब बोलतात त्याचा उलटा अर्थ लावायचा, ते कधीही शिवसेनेबरोबर…: राणे
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray) यांची राजधानी दिल्लीत जी भेट झाली त्यावरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कालच (10 जून) शिवसेनेचं (Shiv Sena) तोंडभरुन कौतुक केलं. पण असं असताना भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार नारायण राणे […]
ADVERTISEMENT
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray) यांची राजधानी दिल्लीत जी भेट झाली त्यावरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कालच (10 जून) शिवसेनेचं (Shiv Sena) तोंडभरुन कौतुक केलं. पण असं असताना भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता एक वेगळाच दावा केला आहे.
ADVERTISEMENT
‘पवार जे बोलतात त्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो. शरद पवार कधीही शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे.’ असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत.’
‘जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.’ असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 11, 2021
Sharad Pawar: ‘बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता, सेना विश्वासार्ह पक्ष’, पवारांकडून कौतुकाचा वर्षाव
ADVERTISEMENT
खरं तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेवर प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला.
शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष आहे असंही यावेळी पवार म्हणाले. दुसरीकडे आज शरद पवार यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? याविषयी पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द लक्षात घेतल्यास आपल्याला समजून येईल की, पवारांनी आजवर फक्त बेरजेचं राजकारण केलं आहे.
त्यामुळेच नारायण राणे यांनी आता असा दावा केला आहे की, फक्त काँग्रेसला धमकी देण्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
राज्यात फडणवीस सरकार सत्तेत येण्याआधी तब्बल 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार हे सत्तेत होतं. पण तेव्हा देखील या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मतभेद होते. त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची आघाडी देखील तुटली होती.
अशावेळी आता पुढील निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर एक प्रकारे दबाव तंत्राचा देखील वापर केला जाऊ शकतो आणि त्याची सुरुवात आतापासूनच करण्यात आली असल्याची आता यानिमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.
PM Modi-CM Thackeray: 20 मिनिटांच्या भेटीत बंद दाराआड नेमकी काय चर्चा?, संजय राऊतांनी दिली Exclusive माहिती
पाहा शिवसेनेबाबत निवडणूक लढविण्याबाबत शरद पवार काय म्हणाले होते:
‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली यामुळे महाराष्ट्रात काही लोकांनी बऱ्याच वावड्या उठवल्या. पण त्याला काहीही अर्थ नाही. त्याच्यावर यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. हा पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता त्यात शिवसेनाही आली आहे.’
‘मी सांगितलं की, आम्ही काही शिवसेनेसोबत याआधी काम केलेलं नव्हतं. पण महाराष्ट्र शिवसेना या पक्षाला अनेक वर्षापासून पाहत आला आहे. त्यामुळे माझा या पक्षाबाबत असा अनुभव आहे की, हा विश्वास असणारा पक्ष आहे.’
‘हे सरकार टिकेल.. पाच वर्ष कामही करेल. तसंच फक्त हे सरकार टिकणार नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्रित काम करतील.’ असं म्हणत शरद पवार यानी शिवसेनेचं कौतुक केलं होतं. तसंच आगामी निवडणुका देखील एकत्र लढण्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, आता नारायण राणे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यामुळे काँग्रेस नेमकी भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT