शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण : पुण्यातील एका तरुणाला अटक
Sheetal Mhatre viral Video case : माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून, मुंबई, कल्याणपाठोपाठ पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आलं आहे. युवा सेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांच्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेदरम्यानचा आमदार प्रकाश सुर्वे […]
ADVERTISEMENT

Sheetal Mhatre viral Video case : माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून, मुंबई, कल्याणपाठोपाठ पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आलं आहे. युवा सेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांच्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेदरम्यानचा आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविकास शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओने राजकारण तापलं असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत.
शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करत दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलिसांनी मुंबई, कल्याण, पुण्यातून आरोपींना अटक केली आहे.
Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?