महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला १५ ते १६ मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती
एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. कारण एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. आता सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार […]
ADVERTISEMENT
एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. कारण एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. आता सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला १५ ते १६ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार सांगितलं जातं आहे. मात्र आज या दोघांचा शपथ विधी होऊन एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. ४३ मंत्रिपदांपैकी साधारण १६ मंत्रिपदं ही शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकतात अशी खात्रीलायक माहिती इंडिया टुडेला सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात ४२ ते ४३ मंत्रिपदं कॅबिनेटमध्ये आहेत. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन पदांचाही समावेश आहे. ३० जूनला या दोघांचा शपथविधी झाला आहे. तेव्हापासून राज्याचा गाडा हे दोघेच हाकत आहेत. आता बंडखोर आमदारांपैकी बहुतांश प्रमुख आमदारांना मंत्रिपदं मिळणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे वाचलं का?
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ६५-३५ टक्के
इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे फडणवीस सरकार मध्ये ६५-३५ टक्के असा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यानुसार ६५ टक्के मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येतील तर ३५ टक्के मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील. असं घडलं तर २४ ते २५ मंत्रिपदं भाजपच्या वाट्याला येतील. जेव्हा हे बंड झालं त्यावेळी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती.
मात्र प्रत्यक्षात आपण सरकार बाहेर राहणार असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केलं. त्यानंतर काही वेळातच पक्षाने दिलेल्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. आता भाजपला नव्या मंत्रिमंडळात २४ ते २५ मंत्रिपदं मिळतील तर शिंदे गटाला १५ ते १६ मंत्रिपदं मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपक्ष आमदारांनाही सत्तेत वाटा हवा आहे. कारण त्यांनीही या सरकारला पाठिंबा दर्शवला आहे.
ADVERTISEMENT
भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे तरीही भाजपने मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं आहे. मात्र आता महत्त्वाच्या खात्यांवर भाजप दावा सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची पदं मिळण्याची शक्यता आहे. ती पदं काय असतील आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न मात्र एक महिना उलटूनही कायम आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT