Shiv Sena: शिंदेंनी ऐनवेळी टाकला नवा डाव, ठाकरेंना गमवावं लागणारं धनुष्यबाण?
Shiv Sena Party Constitution and Election Commission Hearing: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगात (Election Commission) देखील आज (10 जानेवारी) ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. आमदार अपत्रातेवरील सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी पुढे ढकलली गेली असताना निवडणूक आयोगात मात्र आज पक्ष आणि चिन्हासाठी […]
ADVERTISEMENT
Shiv Sena Party Constitution and Election Commission Hearing: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगात (Election Commission) देखील आज (10 जानेवारी) ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. आमदार अपत्रातेवरील सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) सुनावणी पुढे ढकलली गेली असताना निवडणूक आयोगात मात्र आज पक्ष आणि चिन्हासाठी सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाने (Shinde Group) निवडणूक आयोगासमोर एक अनपेक्षितपणे वेगळाच मुद्दा मांडत ठाकरे गटाला (Thackeray Group)अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. (shinde group made a new move at the right time thackeray will have to lose dhanushabaan symbol)
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगात तब्बल 2 तासांहून अधिक वेळ ही सुनावणी सुरु होती. ज्यामध्ये ठाकरे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी एक असा मुद्दा मांडला की जो याआधी कधीही चर्चेत आला नव्हता पण तोच मुद्दा या संपूर्ण सुनावणीत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, या सुनावणीनंतरही धनुष्यबाण कोणाचं याबाबत कोणताही निकाल देण्यात आलेला नाही. सध्या तरी याबाबतीच सुनावणी ही आता 17 जानेवारीला होणार आहे.
दरम्यान, याबाबत ‘मुंबई Tak’शी एक्स्क्लुझिव्ह बातचीत करताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी याबाबत शिवसेनेच्या घटनेत बेकायदेशीर बदल करण्यात आल्याचा दावा केला आहे. सुनावणी दरम्यान देखील त्यांनी याच मुद्द्यावर अधिक भर दिला.
हे वाचलं का?
उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख नाही, शिंदे गटाचा स्फोटक दावा
‘उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदावरील नेमणूकच बेकायेदशीर’
‘1998 पर्यंत शिवसेनेची विशिष्ट अशी घटना अस्तित्वात नव्हती. मात्र, निवडणूक आयोगाने याबाबत शिवसेनेला आदेश दिल्यानंतर त्यावेळी शिवसेनची घटना तयार करण्यात आली. ज्यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, कार्यकारणी, पक्षाचं प्रमुख पद या गोष्टींसाठी नियम बनविण्यात आले. यामध्ये शिवसेनाप्रमुखाला हे कोणाचीही नियुक्ती करण्याची किंवा कोणालाही काढण्याचे अधिकार होते.’
ADVERTISEMENT
‘मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 2018 साली उद्धव ठाकरेंनी पक्षात कोणत्याही निवडणुका न घेता थेट पक्षप्रमुख पद आणि शिवसेनाप्रमुख या पदाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले. खरं तर उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पदासाठी कार्यकारिणीच्या मंजुरीची आवश्यकता होती. पण त्यांनी तसं न करता. आपल्या काही जवळच्या लोकांना हाताशी घेऊन गुप्तपणे स्वत:ला पक्षप्रमुख म्हणून परस्पर नेमलं. त्यामुळे हे पद आणि त्यानंतर शिवसेनेत केलेल्या नेमणुका याच बेकायदेशीर आहेत.’ असा दावा महेश जेठमलानी यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सत्तासंघर्ष: 2 मिनिटांतच संपली सुनावणी, कोर्टात काय घडलं?
दरम्यान, ठाकरे गटाने या सगळ्यावर असा दावा केला आहे की, शिंदे गटाने केलेल्या आरोपात तथ्य नाही. निवडणूक आयोगासमोर ते फक्त विधानसभा आणि लोकसभेतील बहुमतावर भर देत आहेत. पण पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) सोबत आहेत. असा दावा शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT