संतोष बांगर यांचा पुन्हा राडा; संतप्त होऊन विमा कार्यालयाची तोडफोड
हिंगोली : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थात शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पीक विमा कंपनी कार्यालयात आयोजित बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचे पाहुन बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट कार्यालात घुसून साहित्याची मोडतोड केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगोलीतील शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये आयसीआयसीआय लोम्बर्ड […]
ADVERTISEMENT
हिंगोली : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थात शिंदे गटाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पीक विमा कंपनी कार्यालयात आयोजित बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचे पाहुन बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट कार्यालात घुसून साहित्याची मोडतोड केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
संपूर्ण महाराष्ट्रासह हिंगोलीतील शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये आयसीआयसीआय लोम्बर्ड जनरल विमा कंपनीला नुकसानीबाबत सर्व माहिती दिली होती. मात्र विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांच्या बनावट सह्या केल्या असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत होत्या.
यामुळे सर्वेक्षणाच्या तक्रारीसंदर्भात आमदार संतोष बांगर यांनी कृषी अधिकारी, विमा अधिकारी यांची एक बैठक बोलावली होती. मात्र अधिकारी या बैठकीला हजर नसल्यामुळे बांगर चांगलेच संतप्त झाले. शेतकऱ्यांसह ते विमा कंपनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहचले. यानंतरच कार्यालयाची तोडफोड केली, असा आरोप करण्यात येत आहे.
हे वाचलं का?
यावेळी संतोष बांगर यांच्या सोबत शेतकऱ्यांचा मोठा जमाव होता. यानंतर शेतकऱ्यांना घेऊन बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सदरील प्रकारासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली. मात्र कार्यकालयात जाऊन तोडफोड करणाऱ्या आमदार संतोष बांगर यांना तोडफोड करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल सध्या विचारला जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडिया आणि माध्यमांवर प्रदर्शित होताच बांगर यांना अनेकांनी ट्रोल करत जाब विचारला होता. त्यानंतर बांगर यांनी बुधवारी दुपारी मध्यान्ह भोजन घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवून जेवणाची पाहणी केली. यावेळी डब्यात करपलेल्या पोळ्या, वारणात अळ्या आढळ्याचा आरोप त्यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT