Shiv Sena UBT: 'भाजप म्हणजे... भा*$% जनता पक्ष', नकली शिवसेनेच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं जहरी प्रत्युत्तर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

नकली शिवसेनेच्या टीकेवर उद्धव ठाकरेंच जहरी प्रत्युत्तर...
नकली शिवसेनेच्या टीकेवर उद्धव ठाकरेंच जहरी प्रत्युत्तर...
social share
google news

Uddhav Thackeray vs PM Modi Amit Shah BJP: पालघर: लोकसभा निवडणूक 2024 चं (Lok Sabha Election 2024) रण आता दिवसेंदिवस अधिकच तापू लागलं आहे. महाराष्ट्रात देखील आता त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना ही नकली शिवसेना असं म्हणत घणाघाती टीका केली होती.  त्यांच्या याच टीकेनंतर उद्धव ठाकरे हे प्रचंड संतापले असून त्यांनी भाजपवर थेट भा*$% जनता पक्ष अशी टीका केली आहे. (lok sabha election 2024 uddhav thackeray venomous reply on fake shiv sena criticism to pm modi and amit shah bjp)

ADVERTISEMENT

मोदी आणि शाह यांनी नकली शिवसेना अशी जी टीका जाहीर सभेतून केली होती ती उद्धव ठाकरेंना प्रचंड जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आज (12 एप्रिल) बोईसर येथील जाहीर सभेत भाजपबाबत बोलताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली. 

पालघरमध्ये ठाकरेंचा भाजपवर घणाघात, वाचा भाषण जसंच्या तसं..

'हे लोकं जे परिवार म्हणतायेत ते म्हणजे त्यांचे फक्त सुटाबुटातील मित्र आहेत. समजून धरून चाला वाढवण बंदर झालं तर कोणाच्या घशात जाईल? दुर्देवाने हे सत्तेत परत आले तर रणगाडे आणून सुद्धा ते लोकं वाढवण बंदर पुरं करतील. आताच हीच वेळ आली आहे.. यांना गाडायचं असेल तर आताच..' 

हे वाचलं का?

'आता तुमच्या पाया पडतील.. पण तुम्ही भुललात तर तुम्हाला ते महागात पडेल. गद्दारांचे दोन मालक सध्या महाराष्ट्रात फिरत आहेत. कोण गद्दार आणि मालक कोण हेही तुम्हाला माहिती आहे. सरळ उघड सांगतो.. यापुढे मी जी टीका करणार आहे ती देशाच्या पंतप्रधानावर नाही तर ती नरेंद्र मोदींवर असेल.' 

'देशाच्या पंतप्रधानांचा मी अपमान करणार नाही, करू शकत नाही. पण निवडणुकीत येऊन.. एकतर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? महाराष्ट्राच्या बाहेरचे आहात तुम्ही.. आणि महाराष्ट्रात येऊन जी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केला.. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता?' 

ADVERTISEMENT

'अरे नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय? मग त्यांचे दुसरे पार्टनर आले. खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शाह.. शिवसेना नकली है.. बोला तुम्ही..' 

ADVERTISEMENT

'पण मी तुम्हाला जे म्हणतो... भारतीय जनता पक्षाला.. हा भा*$% जनता पक्ष आहे.. भा*$% आहे, भेकड आहे.. भ्रष्ट आहे.. नुसतंच मला बोलायचं म्हणून मी भ ची बाराखडी नाही बोलत.. मी भेकड एवढ्यासाठी बोलतोय की, ज्या पद्धतीने त्यांनी गद्दार फोडले ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय याची बंदूक लावली त्यांच्या डोक्यावर.. आणि घेऊन गेले..' 

'या इथूनच पालघरमधूनच गेले ना सुरतेला.. म्हणूनच मी पालघरमध्ये आलोय, बघू यापुढे कोण गद्दार जाऊ शकतो सुरतेला.. तेच बघायला आलो आहे.' 

'तुम्ही माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं.. अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करतायेत. एवढे तुम्ही..' 

'तुम्ही शिवसेना संपवायला निघालात, उद्धव ठाकरेला संपवायला निघालात.. ही यांची वृत्ती आहे. जो यांना देईल साथ त्यांचा करणार हे घात.. ही यांची स्लोगन आहे.. 2019 च्या निवडणुकीत पालघरने चमत्कार केला. पण तेव्हा आम्ही चूक केली होती. तेव्हा मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता.'

'तुम्ही विचार करा.. जी शिवसेना मोदींच्या कठीण काळात सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संपवायला निघतात ते पालघरकरांना काय न्याय देऊ शकतील?'

'भले तुम्ही आमची नकली शिवसेना म्हणून टिंगल-टवाळी करतायेत पण अमित शाह तुमच्या गाडीत अस्सल भाजपचे किती लोकं राहिलेत ते बघा आधी.. म्हणून मी यांना भा#*& म्हणतो.. कारण यांचे स्वत:चे कोणीच नाहीत..  सगळे याला फोड त्याला फोड..'     

'उद्धव ठाकरे जर तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात. संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात. पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का होत नाही?'

'तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे, तिकडे शेपट्या घालता. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे.. माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपवून दाखवा.. हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्यासमोर बसले आहेत.. महाराष्ट्रभर पसरले आहेत. तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन, पाकिस्तान या देशाच्या शत्रूंना संपविण्यासाठी निवडून दिलं होतं. पण देशाचे शत्रू मोकाट आहे. त्यांच्याकडे बघायला देखील तुमची हवा टाइट होते. घाबरता.. पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून बसता..' 

'हा तुमचा भा#$% जनता पक्ष नाही तर दुसरा कोणता जनता पक्ष आहे?' 

'ग्रामीण भागात कुठेही गेलो की, लोकं आवर्जून सांगतात.. भाजपला आम्ही मत देणार नाही, मोदींना तर अजिबात मत देणार नाही.' अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर यावेळी केली आहे.

नकली शिवसेना म्हणत मोदींनी ठाकरेंना डिवचलं.. 

'राज्यात काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली आहे व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत. असं विधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमधील सभेत केलं होतं.

अमित शाहांचाही ठाकरेंवर निशाणा 

'आमच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत ते राहुल गांधींच्या नेतृत्वात लढत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी.' अशी टीका अमित शाह यांनी केली होती.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT