Lok Sabha Election 2024 MNS: 'नरेंद्र मोदी नसते तर..', राज ठाकरेंकडून PM मोदींचं प्रचंड कौतुक
Raj Thackeray and BJP: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. पाहा मुंबईतील पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Raj Thackeray praised PM Modi: मुंबई: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यानंतर सोशल मीडिया आणि जनतेतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. असं असताना आज (13 एप्रिल) पुन्हा एकदा राज ठाकरेंनी त्यांनी पंतप्रधान मोदींना का पाठिंबा दिला याचं स्पष्टीकरण दिलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. असं कौतुक राज ठाकरेंनी यावेळी केलं आहे. (lok sabha election 2024 i supported modi for this if it wasnt for him the ram mandir would not have been built mns chief raj thackeray praises pm modi)
पाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांची आज शिवतीर्थवर बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल याबाबत माहिती दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा का दिला याविषयीही भाष्य केलं.
'नरेंद्र मोदी नसते तर राममंदिर उभंच राहू शकलं नसतं'
'गुढी पाडवा मेळाव्यात जे मी सांगितलं.. माझ्या पक्षातील महाराष्ट्र सैनिकांना.. की, यावेळेस नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचं आहे. त्याचं विश्लेषण मी केलं आहे. पहिल्या पाच वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याच्याबाबतीत जो विरोध करायचा तो विरोधही केला.'
'अनेकदा सांगतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014 च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की, मी भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर धोरणांवर टीका म्हणतात. त्याप्रमाणे ती टीका मी केली होती. अर्थात त्या मोबदल्यात मी काही मागितलं नव्हतं.' असं राज ठाकरे म्हणाले.










