IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' स्वस्त खेळाडूने लखनौला पछाडलं, खेळली जबरदस्त खेळी!
Who is Jake Fraser-McGurk : दिल्ली कॅपिटल्सचा (DC) युवा खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्क मूळचा ऑस्ट्रेलियाचा असून तो अवघ्या 22 वर्षांचा आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जेक फ्रेझरला दिल्ली कॅपिटल्सने स्वस्तात विकत घेतलं आहे.
ADVERTISEMENT

Who is Jake Fraser-McGurk : दिल्ली कॅपिटल्सचा (DC) युवा खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) मूळचा ऑस्ट्रेलियाचा असून तो अवघ्या 22 वर्षांचा आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जेक फ्रेझरला दिल्ली कॅपिटल्सने स्वस्तात विकत घेतलं आहे. दुखापतग्रस्त लुंगी एनगिडीची बदली म्हणून तो संघात सामील झाला आहे. (IPL 2024 Delhi Capitals cheap player Jake Fraser McGurk plays a stunning inning against Lucknow Super Giants)
फ्रेझरला दिल्ली कॅपिटल्सच्या बेस प्राइजमध्ये म्हणजेच 50 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं आहे. 12 एप्रिल रोजी लखनऊ विरुद्धच्या IPL डेब्यू सामन्यात, जेक फ्रेजर-मॅकगर्कने आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांनाच हैराण केलं. त्याने दाखवून दिलं आहे की तो एक तो मोठ्या मंचावरील खेळाडू आहे.
आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात फ्रेझरने 35 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली, ज्यात पाच गगनचुंबी षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. यासह फ्रेझरने कर्णधार ऋषभ पंतसोबत तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दिल्लीच्या विजयाचा रोडमॅप तयार झाला.
जेक फ्रेझर-मॅकगुर्क आहे तरी कोण?
जेक फ्रेझर-मॅकगर्कने यापूर्वी दुबई कॅपिटल्ससाठी ILT20 मध्ये तीन सामने खेळले होते. त्याने आपल्या तीन डावात 213.72 स्ट्राइक रेट आणि 54 च्या सर्वोत्तम धावसंख्येसह 109 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही जेकचे कौतुक केले आहे.










