IND vs SL: भारत-श्रीलंका T20 मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवचा 'हा' Video लीक!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Suryakumar Yadav- Axar Patel Video : भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिका (IND vs SL T20I 2024 मालिका) 27 जुलैपासून पल्लेकेले येथे सुरू होणार आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव याच्याकडे असेल. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत पोहोचली आहे. (IND vs SL Suryakumar Yadav video leaked before India-Sri Lanka T20 series plan revealed)

ADVERTISEMENT

यादरम्यान, 23 जुलै रोजी भारतीय संघाच्या खेळाडूंनी नेट सराव केला. मात्र, या सरावावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवकडून नकळत चूक झाली. त्याने अक्षर पटेलशी संबंधित असलेल्या प्लॅनचा खुलासा केला, जो या मालिकेच्या प्रसारकाच्या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा : Manoj Jarange: 'भाजप कधीच सत्तेत येऊ देऊ नका', जरांगेंचा मराठा समाजाला उघडउघड मेसेज!

या मालिकेचे ब्रॉडकास्टर सोनी स्पोर्ट्सने हा व्हिडीओ शेअर केल्यावर अक्षरसाठी कोणत्या प्रकारचे नियोजन केले आहे हे समोर आले. सोनी स्पोर्ट्सच्या व्हिडीओमध्ये सूर्या आणि मोहम्मद सिराज पायऱ्या उतरून मैदानात येताना दिसत आहेत. त्यांच्या मागे अक्षरही मैदानात येतो. या दरम्यान सूर्य म्हणतो, 'हळु, जरा हळु... तिसऱ्या-चौथ्या षटकात फक्त तूच दिसणार आहेस.' नव्या कर्णधार सूर्याच्या या वक्तव्यावरून दिसते की, भारतीय संघ पॉवरप्लेमध्ये अक्षरला गोलंदाजी करायला लावणार. यावेळी, तिसऱ्या किंवा चौथ्या षटकात त्याला मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

हे वाचलं का?

अक्षरने T20 विश्वचषक 2024 दरम्यान पॉवरप्लेमध्ये अनेक वेळा गोलंदाजी केली आहे. त्याने आठ सामन्यांत नऊ विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान अक्षर हा भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असेल.

हेही वाचा : Salman Khan: 'मला संपवण्याचा प्लॅन, माझं खानदानही धोक्यात...'; सलमानने उडवून दिली खळबळ

 

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघात कोणते खेळाडू?

भारताचा T20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha: अजित पवार-अमित शाहांची मध्यरात्री बैठक, हव्यात 'इतक्या' जागा?

 

भारताचा एकदिवसीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग , रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

ADVERTISEMENT

भारत-श्रीलंका 2024 सामन्यांचे वेळापत्रक

  • 27 जुलै- पहिला T20 सामना, पल्लेकेले

  • 28 जुलै- दुसरा T20 सामना, पल्लेकेले

  • 30 जुलै- तिसरा T20 सामना, पल्लेकेले

  • 2 ऑगस्ट- पहिला वनडे सामना, कोलंबो

  • 4 ऑगस्ट- दुसरा वनडे सामना, कोलंबो

  • 7 ऑगस्ट- तिसरा वनडे सामना, कोलंबो
     

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT