MCA Election: शरद पवार गटाचे अजिंक्य नाईक विजयी, MCA चं अध्यक्षपद कसं मिळवलं?
MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी संजय नाईक यांचा पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
MCA निवडणुकीत शरद पवार गटाचे अजिंक्य नाईकांनी मिळवला विजय
आशिष शेलार गटाचे संजय नाईक यांचा पराभव
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष अजिंक्य नाईक
Ajinkya Naik won in MCA Election: मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Mumbai Cricket Association President Election)पार पडली असून त्यात अजिंक्य नाईक यांनी मोठा विजयी मिळवला आहे. अजिंक्य नाईक (Ajinkya Naik)यांना शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला होता. यामुळे या अजिंक्य नाईक यांच्यासाठी ही निवडणूक फारच सोप्पी झाली. त्यांनी तब्बल 221 मतं मिळवत संजय नाईक (Sanjay Naik) यांचा पराभव केला. त्यांना केवळ 114 मतंच मिळाली. (sharad pawar camp candidate ajinkya naik big victory in mca president election sanjay naik lost)
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA)दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचे टी-20 विश्वचषकादरम्यान अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. ज्यामध्ये अजिंक्य नाईक यांनी तब्बल 107 मतांनी विजय मिळवला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Gautam Gambhir : ''टीआरपीसाठी सगळं...'', हेड कोच बनताच कोहलीबाबत स्पष्टच बोलला गंभीर
MCA ची ही निवडणूक अजिंक्य नाईक यांनी जिंकली असली तरी त्यांच्यासाठी शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या नेत्यांनी ताकद लावली असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे संजय नाईक यांच्यासाठी आशिष शेलार हे मैदानात उतरले होते. पण या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी सहज विजय मिळवला.
दरम्यान, अजिंक्य नाईक यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून अजिंक्य नाईक यांचं कौतुक केलं आहे. पाहा आव्हाड नेमकं काय म्हणाले.
हे वाचलं का?
एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव आणि शरद पवार गटाचे उमेदवार श्री.अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली. भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती. मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीसाठी 335 सभासदांनी मतदान केलं. पैकी 224 मते घेत अजिंक्य नाईक यांनी घवघवीत यश मिळवले. MCA अध्यक्ष श्री.अमोल काळे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. अजिंक्य नाईक यांचं मन:पूर्वक अभिनंदन..!
हे ही वाचा>> तो एक कॅच अन् थेट कर्णधार, हार्दिकला मागे सारून सूर्यकुमार कसा बनला Captain? वाचा Inside Story
MCA ची निवडणूक का असते एवढी महत्त्वाची?
MCA ही भारतीय क्रिकेट विश्वातील एक महत्त्वाची संघटना आहे. मुंबईत क्रिकेटचं एक आगळंवेगळं स्थान आहे. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर उपनगरांपर्यंत एमसीएच कार्यक्षेत्र आहे. मुंबईतून अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर हे उदयास येत असतात. ज्यामध्ये MCA चा खूप मोठा हात असतो. यामुळेच MCA च्या अध्यक्षपदाची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची असते.
MCA च्या निवडणुकीत कोण-कोण करतं मतदान?
MCA च्या निवडणुकीत मैदान क्लब, ऑफिस क्लब, शाळा-महाविद्यालयं आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू हे मतदान करतात. MCA चे सध्या 375 मतदार आहे. ज्यापैकी आजच्या निवडणुकीत 335 मतदारांनी मतदानं केलं आणि अजिंक्य नाईक यांच्या पारड्यात आपलं मतांचं दान टाकलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT