Gautam Gambhir : ''टीआरपीसाठी सगळं...'', हेड कोच बनताच कोहलीबाबत स्पष्टच बोलला गंभीर
Gautam Gambhir News : श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विराट कोहलीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. विराट कोहलीसोबत नातं कसं आहे? असा सवाल गौतम गंभीरला करण्यात आला आहे. यावर गौतम गंभीरने जे उत्तर दिले आहे, याची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
"विराट आणि रोहित दोघांकडेही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे.
दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत.
गौतम गंभीरकडून विराट कोहली आणि रोहित शर्माचं कौतुक
Gautam Gambhir On Virat Kohli : भारताचा नवीन हेड कोच गौतम गंभीरच्या नेतत्वात टीम इंडिया (Team India) श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी गौतम गंभीर(Gautam Gambhir) आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत मोठं विधान केले आहे. (gautam gambhir head coach big statement on virat kohli relation team india sri lanka tour virat rohit sharma play 2027 world cup)
ADVERTISEMENT
श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विराट कोहलीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. विराट कोहलीसोबत नातं कसं आहे? असा सवाल गौतम गंभीरला करण्यात आला आहे. यावर गौतम गंभीरने जे उत्तर दिले आहे, याची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : RSS : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 58 वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली
आमच्या दोघांमध्ये जे काही सुरू असतं ते टीआरपीसाठी पोषक आहे. माझे विराटसोबतचे नाते चांगले आहे. आम्ही दोघे 140 कोटी भारतीयांच प्रतिनिधित्व करतो. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असे, गौतम गंभीर म्हणाला आहे.
हे वाचलं का?
"माझ्या नियुक्तीनंतर माझं आणि विराट कोहलीचं बोलण झालं आहे. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, एक जागतिक दर्जाचा क्रिकेटर आहे, असे कौतुक देखील गौतम गंभीरने केले आहे. आणि आम्ही दोघे आमच्या संघासाठी सामने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करू, असा विश्वास देखील गौतम गंभीरने व्यक्त केला आहे.
रोहित-विराट वर्ल्ड कप खेळणार
दरम्यान याच पत्रकार परिषदेत गंभीरने आणखीण एक मोठं विधान केले आहे. "विराट आणि रोहित दोघांकडेही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, ते जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, कोणत्याही संघात ते दोघेही असतील - चॅम्पियन्स ट्रॉफी, ऑस्ट्रेलिया मालिका आहे. तसेच फिटनेस चांगली राहिल्यास 2027 चा वर्ल्डकपही खेळतील, असं मोठं विधान केले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: अर्ज भरलेल्या महिलांसाठी मोठी बातमी, सरकारचा 'तो' निर्णय अन्...
श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक
27 जुलै- पहिला T20 सामना, पल्लेकेले
28 जुलै- दुसरा T20 सामना, पल्लेकेले
30 जुलै- तिसरा T20 सामना, पल्लेकेले
2 ऑगस्ट- पहिला वनडे सामना, कोलंबो
4 ऑगस्ट- दुसरा वनडे सामना, कोलंबो
7 ऑगस्ट- तिसरा वनडे सामना, कोलंबो
ADVERTISEMENT
दरम्यान नवीन हेड कोचची जबाबदारी घेतल्यानंतर गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. त्यामुळे या दौऱ्यात टीम इंडिया नेमकी कशी कामगिरी करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT