तो एक कॅच अन् थेट कर्णधार, हार्दिकला मागे सारून सूर्यकुमार कसा बनला Captain? वाचा Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूर्यकुमारची कर्णधारपदी का निवड झाली?

point

ऋतुराज आणि अभिषेक संघातून बाहेर का ?

point

विराट-रोहित आणि बुमराहबद्दल गंभीर काय म्हणाला?

Hardik vs Suryakumar : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेचे नेतृत्त्व अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा करणार आहे. मात्र टी 20 क्रिकेटमधून रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्याने आता टीम इंडियाला  सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कॅप्टन मिळाला आहे. तसेच, या दौऱ्याने टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कार्यकाळ सुरू होत आहे. (india vs srilanka how did suryakumar yadav become captain after beating hardik pandya know the inside story)

ADVERTISEMENT

पण, यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनी भारतीय क्रिकेट आणि सूर्यकुमार यादवच्या निवडीसंबंधित प्रश्नांची उत्तरे दिली.

हेही वाचा : New Tax Regime 2024 : नव्या आयकर रचनेमुळे तुम्हाला किती रुपयांचा फायदा होणार?

सूर्यकुमारची कर्णधारपदी का निवड झाली?

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, 'सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो योग्य उमेदवारांपैकी एक आहे. तो सर्वश्रेष्ठ T20 फलंदाजांपैकी एक आहे. हार्दिक पांड्याचा फिटनेस आव्हानात्मक ठरला आहे. हार्दिक हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. निवडक (सिलेक्टर) / प्रशिक्षकांसाठी त्याला प्रत्येक सामना खेळायला लावणे कठीण होऊन जाते. आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत.'

हे वाचलं का?

ऋतुराज आणि अभिषेक संघातून बाहेर का ?

ऋतुराज आणि अभिषेकला संघातून वगळण्यात आल्याबद्दल अजित आगरकर म्हणाले, 'संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप वाईट वाटेल. रिंकूकडेच बघा, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याने खूप चांगली कामगिरी केली होती, पण त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. आम्ही फक्त 15 खेळाडूच निवडू शकतो.'

हेही वाचा : Budget 2024 : मोबाईल, चार्जर होणार स्वस्त! अर्थसंकल्पात काय केली घोषणा?

 

तर, गौतम गंभीर म्हणाला, 'माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडू मला नेहमी साथ देतील. ड्रेसिंग रूममध्ये आनंदी वातावरण असणे महत्त्वाचे आहे. मला गोष्टी गुंतागुंती करायच्या नाहीत. मी एका अतिशय यशस्वी संघाचे नेतृत्व करत आहे.का 

ADVERTISEMENT

विराट-रोहित आणि बुमराहबद्दल गंभीर काय म्हणाला?

गौतम गंभीर म्हणाला, 'जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. रोहित आणि विराट टी-२० खेळत नाहीत, त्यामुळे त्यांना बहुतांश महत्त्वाच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहावे लागेल. एखाद्या फलंदाजासाठी, जर तो चांगले क्रिकेट खेळू शकतो आणि चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर त्याने सर्व सामने खेळले पाहिजेत. केवळ जसप्रीत बुमराहसाठीच नाही तर बहुतांश गोलंदाजांसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे.'

ADVERTISEMENT

कोहलीबाबत गंभीर म्हणाला, 'आमच्यात खूप चांगले संबंध आहेत, तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे. आमचे लक्ष 140 कोटी भारतीयांना अभिमान वाटावे हे आहे.'

हेही वाचा : Income Tax New Slabs: टॅक्स भरणाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा; सरकारने दिले गिफ्ट

 

भारतीय संघ 27 जुलै रोजी श्रीलंका दौऱ्याला सुरुवात करणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ 12 दिवसांत एकूण 6 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून पल्लेकेले येथे खेळले जातील. 

भारत-श्रीलंका सामन्यांचे वेळापत्रक

  • 27 जुलै- पहिला T20 सामना, पल्लेकेले
  • 28 जुलै- दुसरा T20 सामना, पल्लेकेले
  • 30 जुलै- तिसरा T20 सामना, पल्लेकेले
  • 2 ऑगस्ट- पहिला वनडे सामना, कोलंबो
  • 4 ऑगस्ट- दुसरा वनडे सामना, कोलंबो
  • 7 ऑगस्ट- तिसरा वनडे सामना, कोलंबो

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT