Rishabh Pant : संजू सॅमसनने ऋषभवर कशी केली मात? संघ निवडीची Inside Story

मुंबई तक

Team India : रोहितने ऋषभ पंतला एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळेच संजू सॅमसनची T20 मध्ये निवड झाली, पण त्याला एकदिवसीय मालिकेतून बाजूला करण्यात आले.

ADVERTISEMENT

ऋषभ पंत आणि संजू सॅमसन
संजू सॅमसन आणि ऋषभ पंत
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजू सॅमनच्या निवडीची गोष्ट काय?

point

अजित आगरकर ऋषभ पंतबद्दल काय बोलला?

point

के.एल. राहुलची निवड का झाली नाही?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले. विशेषत: भारतीय संघ निवडीच्या निकषांबाबत... ज्या खेळाडूची एकदिवसीय सामन्यात कामगिरी उत्कृष्ट होती त्याला त्या फॉरमॅटमधून वगळण्यात आले. या यादीत संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. संजूने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते, पण त्याला एकदिवसीय फॉर्मेटमधूनच वगळण्यात आले. त्याचवेळी नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे टी-२० मालिकेत अभिषेक आणि गायकवाड यांची कामगिरी चांगली होती, तरीही दोघांनाही टी-२० मधून वगळण्यात आले.

'बीसीसीआय'शी संबंधित एका सूत्राने aajtak.in ला सांगितले की, जेव्हा ऋषभ पंत आणि संजू सॅमसनचा प्रश्न आला तेव्हा रोहित शर्माने या प्रकरणात हस्तक्षेप केला. 

संजू सॅमसनची टी२० संघात निवड

बीसीसीआयच्या बैठकीत रोहितने ऋषभ पंतला एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळेच संजू सॅमसनची T20 मध्ये निवड झाली, पण त्याला एकदिवसीय मालिकेतून बाजूला करण्यात आले.

हेही वाचा >> हार्दिक पंड्याला डावलून सूर्यकुमार यादवला का केलं कर्णधार?

'बीसीसीआय'च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वनडे मालिकेसाठी संजू सॅमसनची निवड करायची की ऋषभ पंतची, यावर चर्चा झाली. कारण एकदिवसीय विश्वचषकात विकेटकीपर म्हणून केएल राहुलची कामगिरी उत्कृष्ट होती. आता प्रश्न असा की, संजूने आपल्या शेवटच्या वनडेत शतक झळकावूनही तो संघाबाहेर का? याचे कारण आता समोर आले आहे. यात रोहित शर्माचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp