प्रेयसीचा मोबाईल चेक केला अन् संतापला, प्रियकराने सगळंच संपवलं, उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेत...
Meerut BA student murder: बीएच्या विद्यार्थिनीच्या हत्येचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी ती परीक्षा देण्यासाठी घरातून बाहरे पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. आता तिचा एका उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेतील मृतदेह सापडला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीचा मोबाईल चेक केला अन् संतापला
प्रियकराने सगळंच संपवलं
उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेत...
Meerut Crime News : बीएच्या विद्यार्थिनीच्या हत्येचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी ती परीक्षा देण्यासाठी घरातून बाहरे पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. आता तिचा एका उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेतील मृतदेह सापडला आहे. तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. त्याने आपला आरोप कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमधील आहे.
उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेत..
मेरठच्या रोहटा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातून तीन दिवसांपूर्वी पीडिता बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी ती घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. त्यांनी तिचा शोधही घेतला, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. 16 तारखेला तिच्या नातेवाईकांनी अंकुश नावाच्या एका तरुणावर गुन्हा दाखल करत त्याचावर संशय व्यक्त केला. पोलीस तपास करत असतानाच रविवारी एका गावातील उसाच्या शेतात तिचा अर्धनग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
हे ही वाचा : 'राजा शिवाजी'ने रचला इतिहास, अखेर सैराटचा मोडला रेकॉर्ड
दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय
मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबाने सांगितले की, तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या दरम्यान, पोलिसांनी अंकुशला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने कबुलीत सांगितले की, मृत तरुणी आणि त्याच्यात प्रेमसंबंध होते. त्या दिवशी ती त्याच्यासोबतच होती. रस्त्यात त्याने तिचा मोबाईल तपासला आणि तो हादरुनच गेला. त्याला संशय आला की, तरुणीचे आणखी कुणाशी तरी संबंध आहेत. त्याला राग आणि त्याने तिचा खून केला.
हे ही वाचा : नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर अटकेत, CBI ने ठोकल्या बेड्या; पुण्यात काय घडलं?
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांच्या पाच टीम्स करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तरुणाला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी आरोपीने सांगितले की, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्या दिवशी दोघं सोबतच होते. त्याने तिचा फोन बघितला आणि तिचे दुसऱ्या कुणाशी तरी पसंबंध असल्याचा त्याला संशय आला. यावरुन संतापलेल्या तरुणाने तिची हत्या केली. सध्या मृतदेह पोस्ट मार्टसाठी पाठवण्यात आला आहे.









