जुन्या प्रेयसीला परत मिळवण्याचं वेड, प्रियकरानं सगळ्या कुटुंबावरच..

मुंबई तक

एका प्रियकराने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा शेवट करण्याचा प्रयत्न केला. ‘जर तू माझी होऊ शकत नाहीस, तर मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’ याच भयानक मानसिकतेतून प्रियकराने 'टोकाचे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

जुन्या प्रेयसीला परत मिळवण्याचं वेड,

point

प्रियकरानं सगळ्या कुटुंबावरच..

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका प्रियकराने एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा शेवट करण्याचा प्रयत्न केला. ‘जर तू माझी होऊ शकत नाहीस, तर मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’ याच भयानक मानसिकतेतून एका प्रियकराने आपली पूर्वप्रेयसी, तिचा पती आणि दोन निष्पाप मुलांवर ॲसिड फेकून त्यांना जिवंत जाळण्याचा थरारक प्रयत्न केला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, आरोपीने पोलिसांवरही गोळीबार केल्याने पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत तो गंभीर जखमी झाला आहे.

अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध

उमेश कश्यप आणि लक्ष्मी या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र, अविवाहित असताना ते एकत्र येऊ शकले नाहीत आणि लक्ष्मीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावून दिले. लग्न झाल्यानंतर लक्ष्मी सासरी गेली, तिचे घर बसले आणि ती दोन मुलांची आईही झाली. परंतु, लग्नानंतरही उमेश आणि लक्ष्मी यांचे एकमेकांना भेटणे थांबले नाही. त्यांचे जुने प्रेम अवैध संबंधांच्या रूपात पुन्हा सुरू राहिले. दोघेही लपून-छपून भेटत होते, पण या भेटी एक दिवस तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी काळ ठरतील, याची पुसटशी कल्पनाही लक्ष्मीला नव्हती.

हे ही वाचा : मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं.. बापाचं हैवानी कृत्य

जुनं प्रेम परत मिळवण्याचं वेड

गेल्या काही दिवसांपासून उमेशच्या डोक्यात लक्ष्मीला पुन्हा मिळवण्याचे वेड शिरले होते. त्याने लक्ष्मीवर पतीला सोडण्यासाठी आणि आपल्याशी लग्न करण्यासाठी सतत दबाव आणण्यास सुरुवात केली. परंतु, दोन मुलांची आई असलेल्या लक्ष्मीने आपला संसार उद्ध्वस्त करण्यास साफ नकार दिला. हाच नकार उमेशला सहन झाला नाही. काल (17 मे) उमेश लक्ष्मीला भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी पोहोचला. तिथे लक्ष्मी आणि तिचा पती हजर होते. कुणाला काही कळण्याच्या आतच उमेशने खिशातील ॲसिडची बाटली काढून संपूर्ण कुटुंबावर ओतली. या हल्ल्यात लक्ष्मी, तिचा पती आणि दोन निष्पाप मुले गंभीररीत्या भाजली गेली. घरामध्ये आरडाओरडा आणि वेदनेने विव्हळणाऱ्या मुलांचा आक्रोश ऐकून परिसरात भीतीचे वातावरण पसरले, तर आरोपी उमेश तिथून हसत हसत फरार झाला.

हे ही वाचा : 'राजा शिवाजी'ने रचला इतिहास, अखेर सैराटचा मोडला रेकॉर्ड

गोळीबारात जखमी, कुटुंबाची प्रकृती चिंताजनक

घटनेची माहिती मिळताच शेरगड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रात्रीच्या अंधारातच चारही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर आरोपीचा शोध सुरू असतानाच, तो गावाबाहेर एका पुलाखाली लपून शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला घेरले असता, उमेशने पोलिसांवरच अंधाधुंध गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून अवैध पिस्तूल आणि काडतूस जप्त केले असून, सध्या जखमी पोलीस आणि आरोपी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तुरुंगात पाठवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे, तर दुसरीकडे ॲसिड हल्ल्यातील जखमी कुटुंबाची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक आहे.
 

हे वाचलं का?