Mohammad Shami : सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडलं मौन
Mohammed Shami & Sania Mirza : शमीने सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मी एकटा खूप आनंदी आहे आणि स्वत:च्या फिटनेसवर लक्ष देत आहे. तसेच लग्नाबाबत अफवा पसरवणाऱ्यांना त्याने चांगलेच सुनावले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फोन उघडल्यावर तुम्हाला तुमचाच फोटो दिसतो
मी सध्या स्वत:च्या फिटनेसवर लक्ष देत आहे.
अफवा पसरवणाऱ्यांना त्याने चांगलेच सुनावले
Mohammed Shami & Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत. यानंतर सानिया मिर्झाचे नाव अनेकदा टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीसोबत (Mohammed Shami) जोडलं गेलं होतं. दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर आता पहिल्यांदाच मोहम्मद शमीने मौन सोडलं आहे. नेमकं तो काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात. (mohammad shami reaction on sania mirza marriage rumour team india cricketer)
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी शमीने सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मी एकटा खूप आनंदी आहे आणि स्वत:च्या फिटनेसवर लक्ष देत आहे. तसेच लग्नाबाबत अफवा पसरवणाऱ्यांना त्याने चांगलेच सुनावले आहे.
हे ही वाचा : Pune Accident : भरधाव कारने जोडप्याला उडवलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ
लग्नाच्या चर्चांवर शमी म्हणाला की, अगदी विचित्र आहे. फोन उघडल्यावर तुम्हाला तुमचाच फोटो दिसतो, पण मला एकच सांगायचे आहे की हे कोणी करू नये. सोशल मीडियावर जबाबदारीने वागले पाहिजे आणि अशा बिनबुडाच्या बातम्या पसरवणे टाळले पाहिजे, असे
आवाहन शमीने नेटकऱ्यांना केले आहे.
मीम्स ही खिल्ली उडवण्यासाठी असतात हे मला मान्य आहे, पण जर ते एखाद्याच्या आयुष्याशी संबंधित असतील तर तुम्ही मीम्स खूप विचारपूर्वक बनवाव्यात, असा सल्ला देखील शमीने नेटकऱ्यांना दिला आहे.










