Lok Sabha Election 2024: 'मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवीन...', शरद पवारांनी पुन्हा ठोकला शड्डू!
Sharad Pawar: लोकसभा निवडणूक प्रचारात शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजप आणि महायुतीला आव्हान दिलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले पवार
ADVERTISEMENT

Sharad Pawar vs BJP: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत जोमाने प्रचार करत आहेत. पक्षात फूट पडलेली असतानाही शरद पवार हे त्याचा फारसा विचार न करता आपले उमेदवार पुन्हा कसे निवडून येतील याची रणनिती सातत्याने आखताना दिसत आहेत. अशातच शरद पवारांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. (lok sabha election 2024 i will change the picture in maharashtra sharad pawar again challenged the bjp and the mahayuti)
2019 विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना फारसं अनुकूल असं वातावरण नव्हतं. मात्र, शरद पवारांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे जवळजवळ दोन्ही पक्षांच्या मिळून 100 च्या जवळपास जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या मदतीने त्यांना सत्ताही मिळाली होती.
दरम्यान, अडीच वर्षानंतर दोन पक्षांमध्ये पडलेली फूट यामुळे राज्यातील राजकारण बदलून गेलं आहे. असं असताना आता पुन्हा एकदा शरद पवार हे नव्या उमेदीने भाजप आणि महायुतीला आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.
'सगळ्यांचं आता तुतारीकडे लक्ष आलेलं आहे. या सगळ्यांच्या सामुदायिक पाठिंब्याने महाराष्ट्र राज्य हे आपण बदलू. नुसती केंद्राची निवडणूक नाही, मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक तुम्ही करा याच्यामध्ये तुतारी, कॉंग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांना विजयी करा. मी महाराष्ट्रातलं चित्र बदलून दाखवीन. महाराष्ट्राचा बदल करून दाखवीन आणि ते व्हायला लोकांची अपेक्षा आहे.' असं विधान करत शरद पवार यांनी एकप्रकारे पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे.
बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी 8 एप्रिल रोजी बारामतीत सभा घेतली होती.. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले होते..
'आज सत्तेचा गैरवापर होतोय. मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक, त्यांच्या मनासारखं नाही म्हटलं की सत्तेचा गैरवापर. मगाशी मी बोलताना सांगितलं एके काळी मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि मी केंद्राचा कृषी मंत्री होतो. माझं धोरण असायचं कुठलंही राज्य, कोणता मुख्यमंत्री आहे ते बघायचं नाही. त्या राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे. गुजरातचे अनेक प्रश्न मी सोडवले, त्याचं एक समाधान दिसलं. एक दिवशी मोदीसाहेबांनी माल कळवलं मला बारामतीला यायचय. या म्हटलं. ते आले, बारामतीला संस्था बघितल्या. एक ठिकाणी भाषण केलं, भाषणात त्यांनी सांगितलं, मी राजकारणात जो आलोय आणि यशस्वी झालोय मी पवार साहेबांचं बोट धरून आलो. तुम्ही कधी ऐकलं होतं का? हे भाषण त्यांनी केलं होतं बारामतीला.'