Baramati: शरद पवारांचं 'ते' विधान सुनेत्रा पवारांच्या जिव्हारी.. डोळ्यात आलं टचकन पाणी!, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

सुनेत्रा पवारांना रडूच कोसळलं
सुनेत्रा पवारांना रडूच कोसळलं
social share
google news

Sunetra Pawar Crying: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) ही महाराष्ट्रासाठी सर्वाथाने चर्चेत आहे. त्यातच बारामती हा लोकसभा मतदारसंघ तर अवघ्या देशासाठी हॉट फेव्हरट ठरला आहे. कारण शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट लढत आहे. पण आता याच मतदारसंघात 'मूळ पवार' यावरून निवडणुकीची लढाई सुरू झाली आहे. पण याच मुद्द्यावरून सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारताच त्यांना मात्र अश्रू अनावर झाले.. (lok sabha election 2024 sharad pawar said original pawar and outside pawar sunetra pawar broke down in tears what is the exact incident baramati lok sabha)

सगळ्यात आधी हे संपूर्ण प्रकरण काय हे आपण जाणून घेऊया.. 

बारामतीची लढाई ही अजित पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. कारण याच निवडणुकीवर अजित पवारांचं पुढचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अजित पवारांनी दोन दिवसापूर्वी जे विधान केलं त्यानंतर 'पवार' यावरून सगळा वाद सुरू झाला आहे.

हे ही वाचा>> 'मोदी नसते तर..' राज ठाकरेंकडून PM मोदींचं प्रचंड कौतुक

मतदानाच्या दिवशी जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं..: अजित पवार 

बारामतीत एका सभेत भाषण करताना अजित पवार म्हणाले होते की, 'तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठिशी उभे राहिला आहात. उद्याच्या.. मतदानाच्या दिवशी जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं.. त्यामुळे कुठे प्रश्न येणार नाही. कुठे आपली परंपरा आपण खंडीत केली अशी भावनाही कोणाच्या मनात येणार नाही..' 

'1991 ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं.. म्हणजे मला.. नंतर वडिलांना निवडून दिलं.. म्हणजे साहेबांना. नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला.. म्हणजे सुप्रियाला. आता सुनेला निवडून द्या. सगळी फिट्टमफाट.. वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सूनही खुश आणि तुम्हीही खुश.' असं विधान अजित पवार यांनी केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार... 

दरम्यान, याचबाबत काल (12 एप्रिल) पुण्यात एका पत्रकार परिषदेत शरद पवारांना विचारण्यात आलं की, 'अजित पवार म्हणाले की, बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं. लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या.. आतापर्यंत बारामतीकर हे पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे सुनेला निवडून द्या.' 

यावर शरद पवार एवढंच म्हणाले की, 'त्याच्यात चुकीचं काय आहे? असं आहे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार...'

पवारांचा ते विधान सुनेत्रा पवारांच्या जिव्हारी... 

शरद पवारांनी केलेल्या विधानावरून आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बरंच राजकारण सुरू झालं आहे. मात्र, पवारांनी जी टिप्पणी केली ती सुनेत्रा पवार यांच्या मात्र, चांगलीच जिव्हारी लागली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'अजितदादांनी 2019 मध्येच आम्हाला BJP मध्ये..'

एएनआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने सुनेत्रा पवार यांना जेव्हा विचारलं की, शरद पवार यांनी 'बाहेरचे पवार' असं म्हटलं आहे.. तेव्हा सुनेत्रा पवार या प्रचंड भावूक झाल्या.. त्यांना यावर काहीही बोलता आलं नाही. त्यावेळी त्यांना रडूच कोसळलं. त्यानंतर डोळे पुसत त्यांनी थेट गाडीत जाऊन बसणं पसंत केलं..

ADVERTISEMENT

'पवार साहेबांनी या वयात असं बोलणं योग्य नाही...', भाजपने साधला निशाणा

दुसरीकडे याच मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पवार साहेबांनी या वयात असं बोलणं योग्य नाही. ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला, परिवाराला सांभाळलं आहे. परिवारात मतमतांतरं झाले असतील तरी घरातील वरिष्ठ व्यक्तीने अशा पद्धतीने बोलू नये. शेवटी त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही.' असं म्हणत बावनकुळेंनी या विषयाला आणखी हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आता याच मुद्द्यावरून बारामतीकर नेमकी कोणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT