BMC Election: शिंदेंचे 12 शिलेदार ठाकरेंना भिडणार

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Municipal Elections: मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Electiom) आतापासूनच जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackare), भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं अस्तित्व पणाला लागणार आहे. एकीकडे मुंबई आमचीच म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेनं बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिका भाजपकडे येणार म्हणत भाजपचे नेतेही मैदानात उतरले आहेत. आता या सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कोणाचा असू शकतो तर तो शिंदे गटाचा (Shinde Group) असणार आहे. (shinde group selected 12 leaders for bmc election assigned a big responsibility)

ADVERTISEMENT

कारण पूर्वी शिवसेनेत (ठाकरे गट) असणारे अनेक मातब्बर नेते हे आता शिंदे गटात आहेत. तर भाजपनेही मुंबईची सत्ता मिळविण्यासाठी स्वत:ची ताकद वापरायला सुरुवात केली आहे. अशात आता आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जणांची स्पेशल टीम बनवली आहे. ज्यांच्यावर मुंबई पालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडूण आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंनी निवडले सहा शिलेदार

हे वाचलं का?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बाळासाहेबांची शिवेसना पक्षाने मुंबईतील स्थानिक आमदार आणि खासदारांची विशेष टीम बनवून त्यांना विविध जबाबदारी दिली आहे. पाहा या विशेष टीममध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे.

1) शिवेसना खासदार गजानन किर्तीकर

ADVERTISEMENT

2) मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर

ADVERTISEMENT

3) खासदार राहुल शेवाळे

4) आमदार सदा सरवणकर

5) आमदार प्रकाश सुर्वे

6) आमदार यामिनी जाधव

7) आमदार मंगेश कुडाळकर

8) आमदार दिलीप लांडे

9) यशवंत जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष, मुंबई महापालिका

10) शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे

11) उपनेत्या आशा मामडी

12) माजी नगरसेविका कामिनी शेवाळे

मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण : एससी, एसटी की महिला प्रवर्ग… पहा कोणता वार्ड कुणाला?

या नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्याचं समजतं आहे.

खरं तर हे सगळे नेते जवळपास मुंबईतीलच आहेत. शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरी केल्यापासून हे सगळे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. शिंदे गटाचे स्थानिक आमदार, खासदार, उपनेत्यांची ही यादी मुंबई पालिकेच्या तयारीसाठी जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या ताकदीने ठाकरे गट, भाजप, मनसे या पालिका निवडणुकीत रणशिंग फुंकणार आहे, त्याच ताकदीने शिंदे गटही मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT