दुर्दैवी! उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी वारी; तिरुपतीला जाणाऱ्या शिवसैनिकाचं वाटेतच निधन
– रोहिदास हातागळे, बीड काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून साकडे घालण्यासाठी बीडवरून तिरुपतीला पायी जात असलेल्या शिवसैनिकाचा रस्त्यातच निधन झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना या घटनेला दुजोरा दिला. तिरुपतीला जात असलेल्या शिवसैनिकाचा दुर्दैवी निधन झाल्याची घटना सोशल मीडियाच्या […]
ADVERTISEMENT

– रोहिदास हातागळे, बीड
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून साकडे घालण्यासाठी बीडवरून तिरुपतीला पायी जात असलेल्या शिवसैनिकाचा रस्त्यातच निधन झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना या घटनेला दुजोरा दिला.
तिरुपतीला जात असलेल्या शिवसैनिकाचा दुर्दैवी निधन झाल्याची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून शनिवारी दुपारी समजल्याचं जाधव म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड शहरातील शिवसैनिक सुमंत रूईकर हे तिरुपतीला साकडे घालण्यासाठी पायी निघाले होते. रुईकर हे चालत असतानाच त्यांना चार दिवसांनी ताप येत होता. त्यामुळे त्यांना कर्नाटकातील रायचूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.