ठाकरे सरकार राहणार की पडणार?, मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद सुरु
मुंबई: शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी आता थेट मातोश्रीलाच आव्हान दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षातील असंख्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्यानं शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं व्हीप जारी केला. मात्र, हा व्हीप शिंदे यांनी अवैध ठरवला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित करत […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी आता थेट मातोश्रीलाच आव्हान दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षातील असंख्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्यानं शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं व्हीप जारी केला. मात्र, हा व्हीप शिंदे यांनी अवैध ठरवला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित करत आहेत.