शिवसैनिक शिंदे गटाच्या गाड्यांमधून उद्धव ठाकरेंच्या सभेला येणार?, भास्कर जाधवांचं विधान

मुंबई तक

मुंबईतल्या दोन मैदानावर होत असलेले मेळाव्यांकडे सगळ्यांच्याचं नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत असून, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी सुरू असून, आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एक विधान केलंय. शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे असो वा उद्धव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबईतल्या दोन मैदानावर होत असलेले मेळाव्यांकडे सगळ्यांच्याचं नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होत असून, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी सुरू असून, आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एक विधान केलंय.

शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे असो वा उद्धव ठाकरे. दोन्ही नेत्यांना दसरा मेळाव्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची संधीच मिळालीये, असंच दिसतंय. कारण दोन्ही गट अधिकाधिक गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करताना दिसताहेत. शिंदे गटाने राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबई येण्यासाठी एसटी बसेस आणि इतर गाड्यांची व्यवस्था केलीये. याच मुद्द्यावर बोलताना भास्कर जाधवांनी विधान केलं.

भास्कर जाधव शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “1800 गाड्या बुक केल्या, त्यांना पैसे भरावे लागतातच. ज्यांना सुरतला जाण्यासाठी, गुवाहाटीला जाण्यासाठी पैशांची कमतरता पडली नाही. त्यांना महाराष्ट्रातल्या एसटी महामंडळाला भरण्यासाठी पैसे कसे कमी पडतील?”, असा प्रश्न भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.

दसरा मेळावा : शिंंदेंच्या शिवसैनिकांसाठी प्रताप सरनाईकांकडून शाही मेजवानीची व्यवस्था