Shiv Sena: चिन्ह, पक्षानंतर ठाकरेंना आणखी धक्का, ‘या’ दोन गोष्टीही निसटल्या!
After losing the Shiv Sena and the symbol, Uddhav Thackeray has now lost two more things: मुंबई: शिवसेनेच्या (ShivSena)इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की ठाकरे घराण्याला (Thackeray Family) सोडून शिवसेना आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) या दोन्ही गोष्टी एका दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (election Commission) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या दोन गोष्टी […]
ADVERTISEMENT
After losing the Shiv Sena and the symbol, Uddhav Thackeray has now lost two more things: मुंबई: शिवसेनेच्या (ShivSena)इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की ठाकरे घराण्याला (Thackeray Family) सोडून शिवसेना आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) या दोन्ही गोष्टी एका दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (election Commission) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या दोन गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याने शिंदे गटात तुफान आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटात मात्र प्रचंड संतापाचं वातावरण आहे सध्या ठाकरेंना सोडून अनेक नगरसेवक, आमदार, खासदार काही शिवसैनिक जात आहे. अशा एक-एक गोष्टी हातातून निसटत असताना आता आणखी एक गोष्ट ठाकरेंकडून निसटली आहे. ती कोणती तेच आपण जाणून घेऊया सविस्तरपणे. (after losing the symbol party name uddhav thackeray has also lost blue tick on youtube and twitter)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर शिवसेना हे अधिकृत पेज आहे. जे व्हेरिफाय असल्याने त्याला फेसबुक आणि ट्विटरवर ब्ल्यू टीक मिळाली होती. मात्र आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावताच त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टीक देखील हटवण्यात आली आहे. आता या सगळ्यामागे ट्विटरची एक पॉलिसी आहे.
‘Amit Shah तर मोगॅम्बो..’, तळवे चाटल्याच्या टीकेवर ठाकरेंचा पलटवार
हे वाचलं का?
ट्विटर अकाऊंटवर आधी शिवसेना असा उल्लेख होता. त्या उल्लेखानंतर शिवसेनेचं अकाऊंट व्हेरिफाय करण्यात आलं होतं, मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर या ट्विटर अकाऊंटवरील नावही बदलण्यात आलं… शिवसेना या नावाऐवजी ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray असं करण्यात आलं, तर या अकाऊंटचं युजर नेम @ShivSenaUBT_ असं करण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावरील या अकाउंटवरील ब्ल्यू टीकही हटविण्यात आली.
यामागे साधा नियम असा की व्हेरिफाय झाल्यानंतर जर तुम्ही अकाऊंटचं नाव बदलणार असाल तर नाव बदलल्यानंतर तुम्हाला पुन्हा अकाऊंट व्हेरिफाय करुन घेणं गरजेचं असतं. ट्विटरच्या याच नियमामुळे शिवसेनेच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टीक हटवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचं नाव, पक्षाचं निवडणूक चिन्ह या दोन गोष्टींनंतर शिवसेना या अकाऊंटवर असलेलं ब्ल्यू टीक देखील आता हटवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं
ADVERTISEMENT
आता शिवसेनेच्या फेसबूकवरही नजर टाकूयात यावर हे आहे शिवसेनेचं अधिकृत फेसबूक अकाऊंट असं म्हटलं आहे. इथं नाव बदललं नसल्यामुळे अजूनही इथली ब्ल्यू टीक कायम आहे. तर तुम्ही पाहत असलेल्या या यूट्यूबवरही नाव बदलल्यामुळे इथली अधिकृत टीक हटवण्यात आली आहे. youtube ला Shiv Sena UBT असं नाव करण्यात आलं आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजूनही नाव बदलण्यात आलेलं नाही, मात्र या नावाच्या खाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं अकाऊंट देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT