अर्जुन खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात गेले का?; काय म्हणाले शिवसेना उपनेते?
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेत दिसलेले आणि बंडखोरांविरोधात दंड थोपटणारे शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकरांनी सगळ्यांनाच धक्का दिला. दिल्लीत गेलेल्या अर्जून खोतकरांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रावसाहेब दानवेंसोबतचाच फोटो समोर आला. त्यानंतर आता अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात दाखल झाल्याचं बोललं जात आहे. अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात गेल्याची चर्चा का […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेत दिसलेले आणि बंडखोरांविरोधात दंड थोपटणारे शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकरांनी सगळ्यांनाच धक्का दिला. दिल्लीत गेलेल्या अर्जून खोतकरांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रावसाहेब दानवेंसोबतचाच फोटो समोर आला. त्यानंतर आता अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात दाखल झाल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
अर्जून खोतकर ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात गेल्याची चर्चा का सुरू झालीये?
शिवसेनेत बंडखोरी झाली, त्यानंतर तीन दिवसानंतर म्हणजेच २४ जून रोजी जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्शियल प्लॅान्ट आणि एक बिल्डिंग व स्ट्रक्चर आदी संपत्तीवर ईडीकडून टाच आणण्यात आली. साखर कारखान्याची जप्त करण्यात आलेली जमीन २०० एकर इतकी आहे.
शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांविरुद्ध ईडीचा तपास सुरू आहे. यात यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी थेट नाव घेत ईडीच्या दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातही अशीच चर्चा सुरू आहे.
हे वाचलं का?
दानवे-खोतकरांची दिलजमाई! अर्जुन खोतकर शिंदे गटात
अर्जून खोतकर काय म्हणाले?
ईडीच्या दबावामुळे तुम्ही दिल्लीत आहात का?, या प्रश्नावर बोलताना शिवसेना उपनेते अर्जून खोतकर म्हणाले, “दिल्लीला का आहे, हे सर्वांना माहिती आहे. माझ्या दिल्लीत असण्यामागचं कारण माध्यमं शोधू शकतात. कदाचित तोच ताण माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतोय.”
ADVERTISEMENT
“अशा बाबतीत कुणीही माणूस विचार करेल.अडचणीत असेल, तर कुणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेलच ना. खूप तणाव असतो. परिवाराचा तणाव असतो. नाही त्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात. काय करणार,” असं ते म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ईडीच्या दबावामुळे शिंदे गटात सहभागी झाल्याचं अर्जून खोतकर यांनी स्पष्टपणे म्हटलं नसलं, तरी त्यांच्या बोलण्याचा सूर एकदरीत दबावामुळे शिंदे गटात सहभागी झालो, असाच आहे. ‘अडचणीत असेल, तर कुणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेलच,’ असं खोतकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर आता खोतकर जालन्यात आल्यावर सविस्तर भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.
ईडी (एकनाथ-देवेंद्र)चा प्रेमळ दबाव असेल -आशिष शेलार
अर्जुन खोतकरांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले की, “त्यांच्या दृष्टीने ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रेमळ दबाव त्यांच्यावर असेल. कारण जुने संबंध त्यांचे आहेत.”
उद्धव ठाकरेंनी अर्जून खोतकरांवर सोपवली होती मोठी जबाबदारी
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या नेत्यांची महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी केली. गेल्या आठवड्यातच विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची पक्षातून हकालपट्टी करतानाच उद्धव ठाकरेंनी अर्जून खोतकर यांची शिवसेना उपनेते या पदावर नियुक्ती केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT