Ashok Dhodi Case : शिवसेना नेते अशोक धोडी हत्या प्रकरणात वापरलेली कार राजस्थानात सापडली

मुंबई तक

हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी या कारमधून राजस्थानला पळून गेले. पोलिसांना या संदर्भात एक गुप्त माहिती मिळाली होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वलसाडमध्ये खाणीत आढळला होता धोडी यांचा मृतदेह

point

अशोक ढोडी प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलिसांची आठ पथकं

point

पोलिसांनी राजस्थानच्या दुर्गम भागातून जप्त केली कार

Ashok Dhodi Case : शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या हत्या प्रकरणानं राज्याला पुन्हा एकदा हादरवलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, यामध्ये पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हत्येत वापरलेली कार राजस्थानमधील एका गावातून जप्त करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

 

हे ही वाचा >>Matrimonial Fraud : मॅट्रिमोनियल साईटवरुन विधवा महिलेशी लग्न, दागिने घेऊन आरोपी पती लंपास, मोठं रॅकेट?

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी या कारमधून राजस्थानला पळून गेले. पोलिसांना या संदर्भात एक गुप्त माहिती मिळाली होती. ज्याच्या आधारे रविवारी रात्री राजस्थानमधील एका दुर्गम गावात छापा टाकून कार जप्त केली.

शिवसेना नेते अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. यानंतर, 31 जानेवारी रोजी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड भागातील खाणीमध्ये बुडालेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, या हत्येत एकूण सात जणांचा सहभाग होता. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अशोक धोडी यांच्या भावासह तीन आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला अटक करण्यासाठी सतत छापे टाकले जात आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp