बबनराव थोरातांनी घेतली शपथ; गद्दारांना कुठं रोखायचं, कुठं ठोकायचं हे ट्रेनिंग दिल्याशिवाय…
ज्ञानेश्वर उंडाळ : हिंगोली : ‘बंडखोरांच्या गाड्या फोडणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल’ या चिथावणीखोर विधानामुळे चर्चेत आलेले शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख बबनराव थोरात पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. आपल्या त्याच वक्तव्याची आठवण करुन देत गद्दारांना कसं रोखयचं आणि कसं ठोकायचं याचं प्रशिक्षण दिल्याशिवाय मी जेवण करायला बसणार नाही, अशी शपथ बबनराव […]
ADVERTISEMENT

ज्ञानेश्वर उंडाळ :
हिंगोली : ‘बंडखोरांच्या गाड्या फोडणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल’ या चिथावणीखोर विधानामुळे चर्चेत आलेले शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख बबनराव थोरात पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. आपल्या त्याच वक्तव्याची आठवण करुन देत गद्दारांना कसं रोखयचं आणि कसं ठोकायचं याचं प्रशिक्षण दिल्याशिवाय मी जेवण करायला बसणार नाही, अशी शपथ बबनराव थोरात यांनी घेतली. ते हिंगोली येथील गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भर सभेत एकच गोंधळ झाला.
काय म्हणाले बबनराव थोरात?
गद्दारांच्या गाड्या फोडा असं म्हटलं, पुण्यात त्याची अंमलबजावणी झाली आणि १५ दिवस येरवडा जेलमध्ये जाऊन आलो. त्यामुळे गद्दारांना कसं रोखायचं आणि कसं ठोकायचं, याच प्रशिक्षण दिल्याशिवाय मी जेवायला बसणार नाही. यावेळी बबनराव थोरात यांनी तेव्हा घडलेला संपूर्ण किस्सा उपस्थितांना ऐकविला. त्यावरुन कार्यकर्त्यांमध्ये आणि स्टेजवर बसलेल्या नेत्यांमध्ये एकच हाश्या पिकला होता.
बबनराव थोरात यांनी यावेळी बोलताना येत्या निवडणुकीत बंडखोर आमदार संतोष बांगर यांना धडा शिकवण्यासाठी, ठाकरे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये शर्यत लावली. आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हापरिषद निवडणुकीत जो जास्त उमेदवार निवडून आणेल त्याला येत्या काळात जास्त प्राधान्य राहिलं, असं बबनराव थोरात यांनी सांगितलं.










