Maharashtra cabinet expansion : “8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे…” -विनायक राऊत

मुंबई तक

-राकेश गुडेकर, रत्नागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार उरकला जाणार असून, अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसमोर नाराजांची मनधरणीचं आव्हान असणार आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना खासदार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

-राकेश गुडेकर, रत्नागिरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार उरकला जाणार असून, अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेसमोर नाराजांची मनधरणीचं आव्हान असणार आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, “40 पैकी 8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले”, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टोला लगावला आहे.

“तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय असं ऐकिवात आहे. प्रत्यक्ष शपथ घेतील, तेव्हा ते खरं ठरेल. दुर्दैवानं 39 दिवसांत मंत्रालयाचं सचिवालय झालं. महाराष्ट्र संपूर्ण उघडा पडला. पूर परिस्थितीकडे पाहायला कोणी नाही. महिलांवर अत्याचार होताहेत तिकडे पाहायला कोणी नाही, पण तरीसुद्धा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत”, असं विनायक राऊत मंत्रिमंडळ विस्तारावर म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp