मुंबई विमानतळावर लावण्यात आलेल्या Adani Airport बोर्डची शिवसेनेकडून तोडफोड
मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नावाचा बोर्ड शिवसेनेने फोडून टाकला आहे. या ठिकाणी शिवसेनैनिकांनी येऊन तोडफोड केली आहे आणि अदानी असं नाव लिहिलेला बोर्ड उखडून टाकला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे बोर्ड मुंबई विमानतळावर लावण्यात आले होते. मात्र शिवसैनिकांनी तोडफोड करत हे बोड शिवसेना स्टाईलने उखडून टाकले आहेत. या ठिकाणी […]
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नावाचा बोर्ड शिवसेनेने फोडून टाकला आहे. या ठिकाणी शिवसेनैनिकांनी येऊन तोडफोड केली आहे आणि अदानी असं नाव लिहिलेला बोर्ड उखडून टाकला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे बोर्ड मुंबई विमानतळावर लावण्यात आले होते. मात्र शिवसैनिकांनी तोडफोड करत हे बोड शिवसेना स्टाईलने उखडून टाकले आहेत. या ठिकाणी वातावरण तंग झालं असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा 13 जुलैला अदानी समूहाकडे सोपवण्यात आला. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असताना, अदानी यांच्या नावे फलक का लावण्यात आले? असा प्रश्न विचारत आणि आंदोलन करत शिवसेनेने इथले बोर्ड उखडून फेकले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भातली नाराजी बोलून दाखवली होती.
रविवारी रात्री अदानी उद्योगाने मुंबई विमानतळाला “अदानी एअरपोर्ट” असं नाव लावलं होतं. आज सकाळपासूनच या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी विमानतळाला लावलेले अदनी एअरपोर्ट नाव तोडून टाकले.
हे वाचलं का?
वाचा काय म्हणाले अरविंद सावंत?
ADVERTISEMENT
अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव बाह्यांवर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. ते काय अदानी एअरपोर्ट आहे का ?. याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?, अशी विचारणा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT