Nagpur MLC : एक फोन अन् गंगाधर नाकाडे सिग्नल तोडून पोहचले… काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nagpur MLC Election 2023 Update :

ADVERTISEMENT

नागपूर : विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर शिक्षक मतदारसंघातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, गंगाधर नाकाडे आणि मृत्युंजय सिंग यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि सतीश इटकेलवार यांनी त्यांचे अर्ज कायम ठेवले. (Shiv Sena (UBT) candidate Gangadhar Nakade withdrew his nomination)

नागपूरमध्ये पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटना आणि महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीतून निलंबित झालेले सतीश इटकेलवार आणि आम आदमी पक्षाचे डॉ. देवेंद्र वानखेडे हे प्रमुख उमदेवार रिंगणात आहेत.

हे वाचलं का?

Nagpur MLC Election 2023 : निष्ठावंत नेत्यानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ

गंगाधर नाकाडे अखेरच्या क्षणी पोहचेल :

दरम्यान, नागपूरच्या जागेवरुन शिवसेना (UBT) आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेरच्या क्षणापर्यंत नेमकं कोण लढवणार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र अखेर नाशिकची जागा शिवसेना (UBT) ला सोडण्यात आली तर नागपूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली. त्यानंतर गंगाधर नाकाडे यांना शिवसेना भवनातून अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आले.

ADVERTISEMENT

मात्र शिवसेना भवनातून आदेश येईपर्यंत जवळपास अडीच वाजून गेले होते आणि ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे गंगाधर नाकाडे यांची चांगलीच धावपळ झाली. ते अखेरच्या क्षणी अक्षरशः सिग्नल तोडून विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आणि अगदी धावत पळत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

ADVERTISEMENT

Nagpur MLC : सतीश इटकेलवारांवर वायुवेगाने कारवाई

सतीश इटकेलवर यांचं निलंबन :

दुसऱ्या बाजूला नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आदेश देऊनही अर्ज कायम ठेवल्याने त्यांच्यावर पक्षाकडून त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांनाचा राष्ट्रवादीचाही पाठिंबा राहिलं असं जाहीर करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT