Uddhav Thackeray : हो… मला तुमची साथ हवी आहे, ठाकरेंची उत्तर भारतीयांना साद
Shivsena | Uddhav Thackeray News : मुंबई : मला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं कोणतंही एक वाक्य किंवा एक शब्द काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच आहोत. हिंदी भाषिक लोकांचा द्वेष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्वेष करा, ते असं कधीही म्हणाले नाही. […]
ADVERTISEMENT

Shivsena | Uddhav Thackeray News :
मुंबई : मला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं कोणतंही एक वाक्य किंवा एक शब्द काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच आहोत. हिंदी भाषिक लोकांचा द्वेष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्वेष करा, ते असं कधीही म्हणाले नाही. आम्ही हिंदू-मुस्लीम आणि मराठी-अमराठी असा भेद कधीही केला नाही. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. मला ताकाला जाऊन भांडं लपवायची सवयं नाही. मला तुमची साथ हवी आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांना संबोधित केलं. ते आज गोरेगाव येथे आयोजित उत्तर भारतीय मेळाव्यात बोलतं होते. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray addressed North Indians in Mumbai)
भाजप म्हणजे हिंदुत्व नाही :
हिंदुत्व हा समान धागा असल्याने आम्ही ३० वर्षे राजकीय मैत्री निभावली. आता त्यांना गरज नसल्याने त्यांनी शिवसेना, अकाली दल अशा पक्षांना सोडलं. आता आम्ही युती तोडली. पण तेव्हाही आम्ही हिंदू होतो. आजही आम्ही हिंदू आहोत आणि उद्याही राहू. आम्ही भाजपला सोडलं, मात्र, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. ते जे आज हिंदुत्व चालवत आहेत, ते मी मानायला तयार नाही.
IPS Rashmi Shukla यांना बढती; फोन टॅपिंगमुळे अडकल्या होत्या वादात









