“खासदारकीला का पडले?”, शिवेंद्रराजे भोसलेंचं उदयनराजे भोसलेंच्या वर्मावर बोट
-इम्तियाज मुजावर, सातारा udayanraje bhosale, shivendra raje bhosale, Satara : साताऱ्याचं राजकारण सातत्यानं राजेंभोवती फिरत आलं आहे. पुन्हा एकदा दोन्ही राजेंमध्ये वादाची ठिणगी पडली असून, याला कारण ठरलं आहे, पेटिंगचं. उदयनराजे भोसले यांचं पेटिंग साकारण्याला आक्षेप घेतला गेला आणि साताऱ्यातील राजकारण पुन्हा तापलं. आता याच प्रकरणावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी डिवचलं […]
ADVERTISEMENT
-इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
udayanraje bhosale, shivendra raje bhosale, Satara : साताऱ्याचं राजकारण सातत्यानं राजेंभोवती फिरत आलं आहे. पुन्हा एकदा दोन्ही राजेंमध्ये वादाची ठिणगी पडली असून, याला कारण ठरलं आहे, पेटिंगचं. उदयनराजे भोसले यांचं पेटिंग साकारण्याला आक्षेप घेतला गेला आणि साताऱ्यातील राजकारण पुन्हा तापलं. आता याच प्रकरणावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी डिवचलं आहे. (satara politics : udayanraje bhosale Vs shivendra raje bhosale)
शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी (11 मार्च) सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पेंटिंगच्या प्रकारावरून पुन्हा निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “खरं पाहिलं तर शहरात अथवा आपल्या असलेल्या मतदारसंघात वाद–विवाद घडू नये, येथील वातावरण कोणत्याही कारणांनी तापू नये जेणेकरून प्रशासनावर दबाव निर्माण होईल. हे पाहण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. शहर तणावमुक्त आणि सर्वचबाबतीत चांगले राहावे यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक असते. मात्र, शहरात जर तणाव निर्माण झाल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतात”, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लक्ष्य केलं.
हे वाचलं का?
पेंटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामं करावीत-उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचा टोला
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून, देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत,” असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
“ईडी माझ्या ताब्यात द्या! मग दाखवतो सगळ्यांना”-उदयनराजे भोसले
ADVERTISEMENT
“आपण कुणाला वेड्यात काढत आहे हे सर्वांना समजते, जनतेलाही ते दिसत असते. माझ्याबाबत सांगितले गेले की, तुम्हीही लोकांची कामे करा म्हणजे तुमचेही पेंटिंग काढले जाईल. मात्र, मला काही केल्या पेंटिंग काढून घ्यायची हौस नाही. मी लोकांची आणि येथील मतदारसंघातील कामे केली म्हणूनच विधानसभेत निवडून आलो आहे.”
उदयनराजेंना चिमटा काढताना पुढे शिवेंद्रराजें म्हणाले, “काहींना पराभव पत्करावा लागला. काहीजण लोकांचं एवढं प्रेम असून देखील निवडणुकीत पडले. खरं तर हा आत्मचिंतनाचा विषय आहे. ते आत्मचिंतन त्यांनी करावे. पेंटिंग काढण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून आपले नाव झाले पाहिजे. संबंधित पेंटिंग त्रयस्थ लोकांनी काढले असते, तर आम्ही समजून घेतले असते. मात्र, माझ्याच गाडीत मागे बसणाऱ्यांनी माझंच पेंटिंग काढायचे, या गोष्टीला काय अर्थ आहे.”
ADVERTISEMENT
सातारा : उदयनराजे म्हणजे नारळफोड्या गँग; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची टीका
झोपेचं सोंग घेतल्यासारखा हा प्रकार -शिवेंद्रराजे भोसले
“कुठेतरी नगरपालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन मी चार पेंटिंग काढले की मला उमेदवारी मिळेल यासाठी अशा गोष्टी केल्या जात आहेत. त्यापेक्षा अशी लोक असण्यापेक्षा नसलेली बरी. मी माझेच पेंटिंग काढायला लावायचे आणि जनतेचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे दाखवायचे, हा म्हणजे झोपलेला आहे असे दाखवून झोपेचे सोंग घ्यायचे असा हा सर्व प्रकार आहे,” अशा शब्दात शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT