पालकमंत्री राष्ट्रवादीला काम देतात आणि शिवसैनिकांना डावलतात ! कोकणात पुन्हा नाराजीनाट्य
शिवसंपर्क अभियान हाती घेतलेल्या सत्ताधारी शिवसेनेला आज कोकणात पुन्हा एकदा नाराजीचा सामना करावा लागला आहे. शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी आलेले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांना शिवसैनिकांच्या रागाचा सामना करावा लागला. शिवसैनिकांनी या बैठकीत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना बदलून उदय सामंत यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. […]
ADVERTISEMENT

शिवसंपर्क अभियान हाती घेतलेल्या सत्ताधारी शिवसेनेला आज कोकणात पुन्हा एकदा नाराजीचा सामना करावा लागला आहे. शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी आलेले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांना शिवसैनिकांच्या रागाचा सामना करावा लागला.
शिवसैनिकांनी या बैठकीत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना बदलून उदय सामंत यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. उत्तर रत्नागिरी भागातील पाच तालुक्यांमधून (चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड) विद्यमान पालकमंत्र्यांच्याविरोधात नाराजी समोर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे 29 मे दरम्यान शिव संपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिपळूणच्या पुष्कर हॉलमध्ये एकत्र जमले होते.
“कार्यकर्त्यांनी तसेच विभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखा प्रमुख यांनी काय काम केले याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मागील अडीच वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी काय काम केले याचा प्रथम खुलासा करावा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नसल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद लावून निघून गेले. त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत. असे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला नको”, अशी मागणी उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.