किरीट सोमय्यांविरुद्ध शिवसैनिकांची पिंपरी-चिंचवडमध्ये घोषणाबाजी, दाखवले काळे झेंडे

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असलेल्या भाजप नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असं निवेदन किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला. यासाठी शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची गाडीही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असलेल्या भाजप नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असं निवेदन किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला. यासाठी शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांची गाडीही रोखून धरली, परंतू सोमय्यांनी शिवसैनिकांकडे दुर्लक्ष करत पुढे जाण्याचं ठरवलं. यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.

यानंतर भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी पवार-ठाकरे कुटुंबावर पुन्हा एकदा आरोप केले.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा जालना सहकारी साखर कारखान्याशी थेट संबंध असल्याची टिका करतानाच ज्या पद्धतीने जरंडेश्वर कारखाना खरेदी केला गेला त्याच पद्धतीने जालना कारखाना खरेदी केल्याचा आरोप करत सोमय्या यांनी केला. यावेळी सोमय्यांनी अर्जुन खोतकरांच्या चौकशीची मागणीही केली.