‘राज्यपालाला जोड्यानं मारलं पाहिजे!’; शिवसेना आमदार राजन साळवींनी भगतसिंह कोश्यारींना दिला इशारा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याच्याविरोधात विविध स्तरावरून पडसाद उमटत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षातील नेत्यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचाविरोधात भूमिका मांडली आहे. आता कोकणातील शिवसेनेकडून देखील निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी देखील राजापूरमध्ये तीव्र शब्दात कोश्यारी यांचा निषेध केला आहे. राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याच्याविरोधात विविध स्तरावरून पडसाद उमटत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षातील नेत्यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचाविरोधात भूमिका मांडली आहे. आता कोकणातील शिवसेनेकडून देखील निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी देखील राजापूरमध्ये तीव्र शब्दात कोश्यारी यांचा निषेध केला आहे. राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, राजन साळवी यांनी अतिशय तीव्र शब्दात राज्यपालांचा समाचार घेतला. साळवी म्हणाले की, महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे, मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी 107 हुतात्मांनी बलिदान दिलेलं आहे आणि अशा मुंबईबाबत वक्तव्य करणाऱ्या माणसाला जोड्यानी हाणलं पाहिजे, असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे. अशा तीव्र शब्दात साळवी यांनी राज्यपालांच्या विरोधातील आपली भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी बोलताना साळवी म्हणाले,गुजराती, राजस्थानी निघून गेले तर नुकसान होईल, असं कोश्यारी म्हणाले होते. तुम्हाला जायचं तर तुम्ही खुशाल जा. महाराष्ट्राला कोणी हात लावू शकत नाही, असं देखील साळवी म्हणाले. तसेच राज्यपाल रत्नागिरीत आले तर त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा देखील राजन साळवी यांनी दिला आहे.
काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?